Rebel karnataka Congress MLAs worried about D. K. Shivkumar | Sarkarnama

कर्नाटकचे बंडखोर काँग्रेस आमदार म्हणाले, डी.के.येतोय, तो काहीही करू शकतो ! 

संजय मिस्कीन 
बुधवार, 10 जुलै 2019

..

मुंबई : ‘डी.के.बरतान... डी.के.बरतान..! येन आद्र माडू बहुदू..! ( डी..के. येतोय. डी.के.येतोय.. तो काहीही करू शकतो...) हे शब्द आहेत कर्नाटकच्या बंडखोर आमदारांच्यात असलेल्या डी.के.शिवकुमारच्या धास्तीचे..! 

डी.के.शिवकुमार म्हणजे कर्नाटक काॅग्रेसचे संकटमोचक..! दाक्षिणात्य चित्रपटातल्या नायकाची इंट्री व्हावी तशी त्यांची कर्नाकटच्या अडचणीतल्या  सरकारच्या वेळी होते. वर्षभरात तीन वेळा जेडीयु-काॅग्रेस सरकारचा पाठिराख ठरलेले डी.के. शिवकुमार आजही पुन्हा मुख्य भूमिकेत आलेत. 

मुंबईतल्या रेनेन्साॅ हाॅटेलात कर्नाटक काॅग्रेसचे बंडखोर आमदार तळ ठोकून आहेत. कुमारस्वामींची सत्ता उलटवण्याची सगळी खेळी यावेळी पक्की झाल्याचे चित्र आहे. पण काल रात्रीपासूनच या बंडखोर आमदारांना डी.के.शिवकुमारच्या आगमनाची चाहूल लागल्या नंतर त्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडे सुरक्षेसाठी त्यांनी मदत मागितली आहे. 

डी.के. शिवकुमार कोणत्याही परिस्थीतीत आमच्या हाॅटेलात येणार नाही याची दक्षताघेण्याची त्यांनी विनंती केलीय. त्यानुसार महाराष्ट्र पोलिसांनी हाॅटेलच्या बाहेर कडकोट बंदोबस्त ठेवलाय. पण डी.के. शिवकुमार राजकारणातला बहाद्दर असल्याचे पुन्हा सिध्द झालेय.

 ज्या हाॅटेलची निवड बंडखोर आमदारांनी सुरक्षित ठिकाण म्हणून केली. त्या हाॅटलेमधेच डी.के. शिवकुमारने रूमभाड्याने घेतली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना हटकताच माझ्याकडे माझ्या रूमची चावी आहे असं सांगत त्यांनी संबधित रूमचे कार्डच पोलिसांस मोरदाखवले. 

डी.के. शिवकुमार ने मागच्या वेळच्या बंडावेळी ही नाराज आमदारांना हाॅटेलनधून अगदी शांतपणे बाहेर काढतच सरकार वाचवले होते. आज पुन्हा डी.के.ची इंट्री या राजकिय नाट्याच्या रणांगणात झाली ...! 

त्यामुळे बंडखोर आमदारांनधे मात्र, ‘डी.के. बरतान.. डी.के.बरतान..’ ची धास्ती असल्याचे चित्र होते...!!
पण हॉटेल व्यवस्थापनाने नंतर अन्य आमदारांच्या आग्रहाने डी. के. चे आरक्षण रद्द केले आणि त्यांना प्रवेश नाकारला . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख