..यामुळे होतेय छत्रपती व मालुसरेंशी मोदी, शहांची तुलना!

...
..यामुळे होतेय छत्रपती व मालुसरेंशी मोदी, शहांची तुलना!

सातारा : नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचा मोह भाजपला का होतोय हेच कळत नाही. आता तर अमित शहांची तानाजी मालुसरेंशी तुलना केली गेली आहे. दोघांची तुलना करून भारतीय जनता पक्षाला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून महाराष्ट्रातील थोर नेत्यांशी मोदी शहांची तुलना महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही, असा इशारा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी दिला.

सैनिक स्कूलमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्री जयंत पाटील आज हेलिकॉप्टरने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

साताऱ्यातील नियोजित मेडिकल कॉलेजच्या प्रश्‍नासंदर्भात ते म्हणाले, जलसंपदा विभागाची जागा मेडिकल कॉलेजला दिली आहे, त्यासंदर्भातील आवश्‍यक ती कार्यवाही लवकरच पूर्ण करून येत्या महिनाभरात हा प्रश्‍न मार्गी लागेल. त्यामुळे या कॉलेजच्या इमारतीचे बांधकाम सुरू होईल. तसेच प्रलंबित असलेल्या जिहे -कठापूर योजनेचे पाणीही येत्या महिन्या दोन महिन्यात दुष्काळी भागाला मिळेल. तसेच जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पांची कामेही सुरू केली जाणार आहेत.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, आता बाळासाहेब पाटील जिल्ह्याच पालकमंत्री झालेले आहेत. ते या सर्वाचा अभ्यास करून योग्य त्या सूचना राज्य सरकारला करतील आणि हा प्रश्‍न मार्गी लावतील.

छत्रपती शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्याशी मोदी आणि शहांची तुलना केली जात आहे, या विषयी विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, नरेंद्र मोदींना सतत शिवाजी महाराजांशी तुलना करण्याचा मोह का होतोय हेच कळत नाही. महाराष्ट्रात पदोपदी सामान्य माणसाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजबाबात अशी वागणूक भाजप करत असल्याचा प्रचंड राग आहे. महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. तानाजी मालुसरे यांची तुलना अमित शहा यांच्याशी करणे हे योग्य नाही. छत्रपतींची इच्छा पूर्ण करून किल्ला सर करण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी आपला देह ठेवला होता. आता अमित शहा कुठे आणि तानाजी मालुसरे कुठे. दोघांची तुलना करणे म्हणजे भारतीय जनता पक्षाला जुना इतिहास पुसून नवीन इतिहास लिहायचा आहे. ही तुलना करण्याचा त्यांचा स्वभाव जात नाही. त्यांच्या या स्वभावाला इलाज नाही, असा टोला त्यांनी मारला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com