rayat kranti offer to udayanraje | Sarkarnama

उदयनराजेंना सदाभाऊंच्या रयत क्रांतीची "ऑफर' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पक्षातून विरोध झाला आहे. त्यामुळे ते कोणती भुमिका घेणार याची उत्सुकता असली तरी भाजपसह सर्वच प्रमुख पक्षाकडून त्यांना निमंत्रण येऊ लागले आहे. 

यामध्ये कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटनाही मागे नाही. उदयनराजेंनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून महायुतीच्या माध्यमातून निवडणुक लढवावी आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी मुक्त करावा, अशी अपेक्षा रयत क्रांती संघटनेने केली आहे. 

यासंदर्भात रयत क्रांती संघटनेने उदयनराजेंच्या समर्थनार्थ काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात संघटनेचे कोअर कमिटी सदस्य संजय भगत यांनी म्हटले की, उदयनराजे हे सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान असून ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडुन आले हा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा गैरसमज आहे. उदयनराजेंच्या स्वाभिमानास धक्का देऊन राष्ट्रवादीने मोठी चूक केली आहे.

या चुकीची शिक्षा राष्ट्रवादीला साताऱ्याची जनता आगामी निवडणुकीत देईल. पण सातारा जिल्हा राष्ट्रवादी मुक्त करण्यासाठी उदयनराजेंनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सातारा लोकसभेची निवडणुक लढवावी. याबाबत संघटनेचे सर्वेसर्वा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही तयारी दर्शविली आहे. 

खोत यांनी यापूर्वी माढा मतदारसंघातून लोकसभा लढविली आहे. तसेच महायुतीच्या माध्यमातून कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि फलटण या तीन विधानसभेच्या जागा लढविल्या होत्या. सध्या खोत यांच्याकडे जिल्ह्याचे सहपालकमंत्री पद असून रयत क्रांती संघटनेची ताकद जिल्ह्यात वाढली आहे.

सध्या रयत क्रांतीचे 27 हजार सदस्य नोंदणी झाली आहे. त्यामुळे रयत संघटनेत येऊन उदयनराजेंनी महायुतीच्या माध्यमातून सातारा लोकसभा निवडणुक लढवावी. सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादी हद्दपार करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख