Ravsaheb Danve says, 'Do not be afraid to store food in the country for two years | Sarkarnama

रावसाहेब दानवे म्हणतात,  घाबरू नका दोन वर्षे पुरेल एवढा देशात अन्नधान्य साठा 

जगदीश पानसरे 
बुधवार, 25 मार्च 2020

गोरगरिबांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था केंद्र सरकार करत असून कोणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आजपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे .आजपासून एकवीस दिवस म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयाचे देशभरातून समर्थन होत असले तरी हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचे काय ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

 यावर अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देशाला दोन वर्षे पुरेल एवढा अन्नधान्य साठा उपलब्ध असल्याचे सांगत दिलासा दिला आहे . गोरगरिबांना अन्नधान्य पुरवण्याची व्यवस्था केंद्र सरकार करत असून कोणीही घाबरण्याचे कारण नसल्याचे दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

 अत्यावश्यक सेवा आणि मुबलक अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केंद्र सरकार करत आहे .त्यामुळे जनतेने घाबरून न जाता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या उपाय योजना आणि खबरदारी घ्यावी. स्वच्छ हात धुवावेत ,एकमेकांच्या संपर्कात येऊ नये ,घरात देखील सोशल डिस्टन्स पाळावे असे आवाहनही रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख