मराठवाड्याच्या प्रश्‍नांवर एकत्र या : रावसाहेब दानवे

मराठवाड्याच्या प्रश्‍नांवर एकत्र या : रावसाहेब दानवे

नांदेड : मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याने या भागाचा विकास होऊ शकला नाही. परिणामी, आपल्याकडूनही दुर्लक्ष झाले आहे. मराठवाड्याचे काय प्रश्‍न आहेत, यावर सर्व आमदार, खासदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी. त्याचा अहवाल तयार करून आगामी काळात या प्रश्‍नांचा पाठपुरावा करावा, असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी विद्यमान आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांना दिला. 

पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दानवे आज जिल्हा दौऱ्यावर होते. अर्धापूर तालुक्‍यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. विद्यमान आमदार, खासदारांसह माजी आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांचे त्यांनी कान टोचले. झाले गेले विसरून अंतर्गत सर्व भेदाभेद दूर सारून पक्षवाढीकडे आता लक्ष द्यावे. मराठवाड्यातील सर्व आमदार, खासदारांनी एकवेळ एकत्र बसून या भागातील प्रश्‍नांसंदर्भात विचारविनिमय करण्याची आता वेळ आली आहे. माजी आमदार, खासदार, तसेच विषयतज्ज्ञांनाही बोलावून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. मराठवाड्यासाठी काय करता येण्यासारखे आहे, कोणत्या समस्या गंभीर आहेत, त्या कशा सुटल्या पाहिजेत याचा अभ्यास करून सतत पाठपुरावा करावा, प्रश्‍न मार्गी लागण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. 

आम्ही युती तोडली नाही 
भाजप- शिवसेना एकत्र लढले. जनतेनेही महायुतीला बहुमत दिले. जनादेशाचा आदर भाजपसह मित्रपक्षांनी केला पाहिजे; पण असे न करता शिवसेनेने निकालाच्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन "अन्य पर्याय मोकळे आहेत,' असे जाहीर करून टाकले. त्यांचा एकच हट्ट आहे, तो म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या फॉर्म्युल्यानुसारच आजवर युती टिकून आहे. शिवसेनेने युती तोडलेली आहे, आम्ही तोडली नाही, त्यामुळे ही युती पुढेही टिकून राहीलच. मात्र, मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसच असतील, असेही दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com