नव्या सरकारला शुभेच्छा; पण जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले तर विरोध करू - रावसाहेब दानवे

उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. आता ते सत्तेवर आणि मुख्यमंत्रीपदावर असल्याने या घोषणा पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो असेही रावसाहेब दानवे म्हणाले.
 नव्या सरकारला शुभेच्छा; पण जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले तर विरोध करू - रावसाहेब दानवे

भोकरदन : राज्यात सत्तारुढ झालेल्या नव्या सरकारला आणि या सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो. विकासाच्या बाबतीत आम्ही नेहमीच सरकारच्यासोबत राहू, पण जनतेच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले, तर मात्र विरोध करू अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाआघाडीच्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. 

शिवाजी पार्कवर महाआघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली. या शिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना या सरकारला शुभेच्छा दिल्या. 

रावसाहेब दानवे म्हणाले, तीन वेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन झाले आहे, ते किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही, तरीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या सरकारला माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यातील जनतेच्या हिताची जी कामे या सरकारकडून केली जातील, त्याला आमचा नेहमीच पाठिंबा असेल. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे जर सरकारने दुर्लक्ष केले तर मात्र आम्ही विरोध करू. 

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा.. 
उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. आता ते सत्तेवर आणि मुख्यमंत्रीपदावर असल्याने या घोषणा पूर्ण करतील अशी मी अपेक्षा करतो असेही रावसाहेब दानवे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com