रावसाहेब दानवेंच्या अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवर येणार

रावसाहेब दानवेंच्या अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह मान्यवर येणार

भोकरदन : जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आपला उमेदवारी अर्ज मंगळवार ता. 2 एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीद्वारे दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित राहणार असून मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील गावातून ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला कार्यकर्ते येणार असून दानवेंनी यासाठी मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे समजते. 
"मै हु चौकीदार' म्हणत.. भारत माता की जय चे नारे देत जिल्ह्यातील सर्वच भागातुन रावसाहेब दानवेंचे समर्थक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.. मिरवणुकीचा समारोप जाहीर सभेत होणार आहे. 

निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी आमदार संतोष दानवे यांनी कंबर कसली आहे. खासदार दानवे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना मतदारसंघातील जबाबदारी आमदार संतोष दानवे यांच्या खांद्यावर असून त्यांनी तालुक्‍यातील खेड्यापाड्यात जाऊन ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यात जोश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

आमदार संतोष दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गावात जाऊन त्या गावाच्या प्रथेप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना टिळा लावून उद्याच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमास येण्याचे आमंत्रण दिले यावेळी सत्तरीतल्या एका वृद्धाने आमदार दानवे यांच्या जवळ जाऊन " लेका काळजी करू नको; दादांचे आम्ही जुन्या काळापासून एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत' असे म्हणत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com