ravsaheb danave and bjp | Sarkarnama

राजकीय नेते आणि मतदारांची निवडणुकीच्या दिशेने वाटचाल - रावसाहबे दानवे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : आगामी काळात राजकीय घडामोडी वेगाने घडणार आहेत, आणि त्याचा थेट संबंध निवडणुकीशी जोडला जाईल. विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि मतदारांचीही वाटचाल निवडणुकीच्या दिशेने सुरू आहे. तुम्हीही मागे राहू नका, निवडणुकीच्या रंगात रंगून जा असा संदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. 

औरंगाबाद : आगामी काळात राजकीय घडामोडी वेगाने घडणार आहेत, आणि त्याचा थेट संबंध निवडणुकीशी जोडला जाईल. विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि मतदारांचीही वाटचाल निवडणुकीच्या दिशेने सुरू आहे. तुम्हीही मागे राहू नका, निवडणुकीच्या रंगात रंगून जा असा संदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. 

भाजपतर्फे औरंगाबाद शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज (ता.7) शहरात घेण्यात आली. बूथ विस्तार आणि त्यांच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना रावसाहेब दानवे यांनी लवकरच निवडणुका लागणार असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, सध्या राजकीय घडामोडीचे काळ असून लोकांचे याकडे बारकाईने लक्ष आहे. भाजपप्रमाणेच इतर राजकीय पक्षांनी देखील 1 बुथ 25 युथ संकल्पना राबवायला घेतली आहे. त्यामुळे आपण मागे पडता कामा नये. तुमच्यातला उत्साह असाच कायम राहू द्या, निवडणुकीच्या रंगात रंगून जा. आपल्याकडे सोपवलेली जबाबदारी व कामे येत्या 20 सप्टेंबरच्या आत संपवा अशी सूचना देखील रावसाहेब दानवे यांनी केली. 

बैठकीनंतर बुथ विस्तारक, तालुका अध्यक्ष, संघटक, महामंत्री व इतर 23 सुचीचे काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची स्वंतत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. बैठकीस विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव,आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरिष बोराळकर आदींची उपस्थिती होती. 

माझ्यासारखे कपडे शिवा 
तालुकानिहाय आढावा घेत असताना वैजापूरचे काम कमी झाल्याबद्दल रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना खास आपल्या शैलीत सुनावले. वैजापूरमधून विधानसभा लढवण्यास अनेकजण इच्छूक असतांना काम कमी कसे? असा टोला लगावतांनाच तुम्ही आता माझ्या सारखे कपडे शिवा आणि घालून फिरा असे सुनावले. दानवेंचा हा टोला न समजलेला एक पदाधिकारी उठला आणि " दादा तुम्ही मला नाही सांगितले, यार तुम्ही सगळेच कपडे शिवा' असे म्हणत त्यांनी बैठक आटोपती घेतली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख