ravsaheb danave | Sarkarnama

आत्महत्या होणार नाहीत असा प्रस्ताव विरोधकांनी द्यावा - दानवे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

नगर : कर्जमाफी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत असतील तर कर्जमाफी करता येईल. सर्व विरोधकांना राजकीय जोडे बाजूला काढून एकत्र यावे लागेल. या राज्यात शेतकरी आत्महत्या करणार नाही असा ठोस प्रस्ताव द्यावा असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.

शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफी होणार नाही याचे संकेत देतानाच ते म्हणाले "आधी शेतीतील गुंतवणूक वाढवू, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी उपाययोजना करू. नंतर कर्जमाफीचा विचार करू.' त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीची चिन्हे धूसर दिसू लागले आहेत. 

शिर्डीत दानवे यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर शिर्डी संस्थानचे पदाधिकारी, पत्रकार यांच्याशी संवाद साधला. कॉंग्रेस व राष्ट्रवादीला त्यांनी चिमटा काढला. ते म्हणाले, दोन्ही कॉग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका व जिल्हा परिषदेत भाजपला चांगले यश मिळाले. शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय राजकीय जोडे बाजूला काढून सोडवावा लागेल.

विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविल्यास त्याचा आम्ही जरूर विचार करू. शिवसेनेचाही समाचार घेत दानवे यांनी, शिवसेनेला ते सत्तेत येतील असे वाटले होते, तथापि, आम्ही सत्तेत आलो. साहजिकच त्यांची चिडचिड होत आहे, असे सांगितले. 

शेतकरी आत्महत्या हा गुंतागुतींचा विषय 
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गुंतागुंतीचा विषय आहे. तो सर्व पक्षांना एकत्र येऊन सोडवावा लागेल. शेतीला पाणी व वीज मिळण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न केले. सध्याची वीजटंचाई ही तांत्रिक बिघाडामुळे आहे. प्रत्यक्षात आपण अतिरिक्त वीज इतर राज्यांना विकत आहोत.

केवळ पायाभूत सुविधांअभावी शेतकऱ्यांपर्यंत वीज पोचत नाही. शेतमालालाही चांगले भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विरोधी पक्षांनी सत्तेत असताना पंधरा वर्षात काय केले, हे उत्तर त्यांनी द्यावे. मगच या प्रश्नावर बोलावे, असा दानवे यांनी प्रश्न केला.  कॉंग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, याबाबत दानवे यांनी, त्याबाबत त्यांनाच विचारावे लागेल, असे सांगून कानावर हात ठेवले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख