पेण:  रवीशेठ पाटील यांना 'आंदोलन सम्राट' विष्णू पाटलांचे आव्हान

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील आणि जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी पेण मतदारसंघातून उमेदवारीसाठी रस दाखवला आहे.
Pen-Ravi-patil-VS-Vishnu-Patil
Pen-Ravi-patil-VS-Vishnu-Patil

पेण  : शेकापचे वर्चस्व असलेल्या पेण विधानसभा मतदारसंघात बाजी मारण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी कॉंग्रेसमधून या पक्षात दाखल झालेले रवीशेठ पाटील प्रमुख दावेदार असले, तरी जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील हेसुद्धा इच्छुक असल्याने पक्षासमोर पेच निर्माण झाला आहे. तसेच रवीशेठ पाटील यांच्यासमोरही आव्हान उभे राहिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारी पेण येथे घेण्यात आल्या. रायगड जिल्हा निरीक्षक म्हणून निताताई केळकर या उपस्थित होत्या.

कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राज्याचे माजी मंत्री रवीशेठ पाटील आणि जिल्हा सरचिटणीस विष्णू पाटील यांनी पेण मतदारसंघातून उमेदवारीसाठी रस दाखवला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातून ऍड. महेश मोहिते, हेमंत दांडेकर, जयवंत अंबाजी आणि शैलेश काते हे चार जण इच्छुक आहेत.

 श्रीवर्धनमध्ये भाजपचे रोह्याचे माजी नगराध्यक्ष संजय कोनकर आणि मागील विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांच्यासह प्रशांत शिंदे, आप्पा ढवळे, प्राजक्ता शुक्‍ल हे इच्छुक आहेत. महाड-पोलादपूरमध्ये बिपीन म्हामुणकर हे एकमेव इच्छुक उमेदवार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील यांनी  दिली.

या सर्व मतदारसंघांमध्ये पेण मतदारसंघातील उमेदवारीबाबत जिल्ह्यात अधिक औत्सुक्‍य आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री रवीशेठ पाटील हे पेणमध्ये प्रमुख दावेदार आहेत. परंतु 'आंदोलन सम्राट' म्हणून ओळख निर्माण केलेले विष्णू पाटील यांनीही या ठिकाणी दावा केल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com