प्रत्येक गावात आघाडी, कार्यकर्त्यांचे आभार मानू किती :  रविशेठ पाटील

mla raviseth patil
mla raviseth patil

पेण  : पेण मतदारसंघात मागील 40 वर्षे शेकापचा आमदार होता. वयामुळे या मतदारसंघात विकासकामे रखडली आहेत. रखडलेली विकासकामे पुढील पाच वर्षांत मार्गी लावून मतदारसंघात विकासगंगा आणणार, असा विश्‍वास भाजपचे नवनियुक्त आमदार रविशेठ पाटील यांनी आज शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांच्या सभेत व्यक्त केला.


पेण येथील शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची विजयी सभा आज 'वैकुंठ' निवासस्थानी आयोजित केली होती. या वेळी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष संजय जांभळे, ज्येष्ठ नेते बाळाजी म्हात्रे, भाजप प्रवक्ते मिलिंद पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शिवसेनेचे जगदीश ठाकूर, अविनाश म्हात्रे, आरपीआयचे विनोद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.


रविशेठ पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या आभार मानायला शब्द अपुरे आहेत. प्रत्येक गावात आघाडी घेतली आहे. मी मंत्री असताना आठ कोटी रुपयांची योजना होती. पाणीपुरवठा प्रश्‍न यासाठी शेकापच्या ताब्यात असलेल्या चार ग्रामपंचायतींनी नाहरकत दाखले दिले नाहीत. वाशी खारेपाट विभागातील पाणीपुरवठा प्रश्‍नाला अग्रक्रम देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. पेण तालुक्‍यातील खारबंदिस्तीबाबत खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहे. खारबंदिस्ती योजना सरकारने स्वतःकडे घ्याव्या. त्यासाठी भरघोस निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

शेकापविरोधात बहुजन समाज एक झाला व आपला रोष या निवडणुकीत व्यक्त केला. शेकाप आमदारांच्या भूलथापांना मतदार बळी पडला नाही, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी या वेळी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com