रायगडमध्ये शेकापला शून्यावर आणून ठेवण्याची या नेत्याची कामगिरी!

रायगड जिल्ह्याच्या काही भागात भाजपला कधी काळी नो एन्ट्री होती. आता तेथील वातावरण बदलून भाजपने येथे वर्चस्व निर्माण केले आहे.
रायगडमध्ये शेकापला शून्यावर आणून ठेवण्याची या नेत्याची कामगिरी!

कर्जत : रायगड  जिल्ह्यावर वर्चस्व ठेवून असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला शून्यावर आणून ठेवण्याची कामगिरी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या विधानसभा निवडणुकीत केली. सेना आणि भाजपचा योग्य समन्वय या जिल्ह्यात दिसला. जे अपक्ष उभे केले त्यालाही भाजप नेत्यांनी पाठिंबा देऊन निवडून आणला. 

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात सहा ठिकाणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप-सेना युतीने बाजी मारली आहे. शिवेसेनेचे तीन, भाजपचे दोन, राष्ट्रवादीचा एक आणि अपक्ष एक आमदार निवडून आला.

राज्यात सेना भाजप युती झाली असली तरी येथील उरण मतदारसंघामध्ये वेगळे चित्र होते. येथे अपक्ष म्हणून महेश बालदी उभे होते. त्यांनी बंडखोरी केली. त्यामुळे उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी पराभवच्या फटका  बसला आहे.  उरण मतदारसंघ बांधण्यासाठी पालकमंत्री चव्हाण आणि आमदार  प्रशांत  ठाकूर  यांनी  मदत केल्यामुळे हेश बालदी यांचे स्वप्न साकार झाले.

चव्हाण यांनी पेण मतदारसंघात भाजपची पेरणी केल्याने तेथे रवी पाटिल भाजपचे आमदार झाले.  त्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी रवी पाटील यांना मदत केली. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचा एक आमदार आधी असताना आता तीन आमदार झाले आहेत. 

पनवेल मतदारसंघात प्रशांत ठाकूर हे निवडून आले. रायगड जिल्ह्यात भाजपा अधिक मजबूत करत सेनेचेही आमदार निवडून येतील अशी रणनीती दोघांनी आखली. त्याचा योग्य परिणाम कर्जतमध्ये दिसला. येथे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना झाला होता. सेनेकडून महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीकडून सुरेश लाड उभे होते. थोरवे यांच्यामागे पालकमंत्री चव्हाण उभे होते. थोरवे यांनी पालकमंत्री यांच्याकडून  संघटचे धडे गिरवले होते. त्याच्या फायदा थोरवे यांना झाला आहे. कर्जत मतदारसंघात भाजपा मजबूत नसल्याने युती झाली नसती तरी थोरवे यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली होती. युती झाल्याने अखेर थोरवे यांच्या गळ्यात सेनेचे तिकीट पडले ,

रायगडमध्ये आज भाजप मजबूत होत आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री यांनी शेकाप, राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना भाजपात घेऊन संघटना आणि जनसंपर्क वाढवला आहेय त्यामुळे रायगड मध्ये भाजपचे  3 आमदार निवडून आणले पालकमंत्री चव्हाण आणि प्रशांत ठाकूर भाजपा वाढवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले होते.  

रायगडमधील जनतेने शेकापला धडा शिकवला आहे. रायगडच्या विकासकामात शेकाप नेहमी विरोधाची भूमिका घेत होता. त्यामुळे रायगडचा विकास होत नव्हता. आता युतीचे सहा आमदार निवडून आले त्यामुळेच मुख्यमंत्री च्या मार्गदर्शन खाली रायगडच्या विकास करण्यास आम्ही समर्थ आहेत. येत्या काळात रायगडचे जे प्रश्न आहेत तेआम्ही निकाली काढू, असे चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com