भाजप प्रवेश करणार का, प्रश्नावर तुपकरांचे फक्त `मिश्किल हास्य'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.
रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रविकांत तुपकर `स्वाभिमानी'ला सोडचिठ्ठी देऊन भाजप प्रवेश करणार, त्यासाठी त्यांचे एकेकाळचे सहकारी व राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मध्यस्थी करणार अशा आशयाच्या बातम्या माध्यमांमधून येऊ लागल्या होत्या. आजच्या राजीनाम्याने या बातम्या या बातम्यांमध्ये तथ्य असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदांचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजप प्रवेश करणार का या प्रश्नावर मात्र मिश्किल हास्य करून उत्तर देण्याचे टाळले. 

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर स्वाभिमानीची मुलुख मैदानी तोफ असलेले रविकांत तुपकर शांत दिसत होते. या काळात ते राजू शेट्टी यांच्याशीही अंतर ठेउनच होते.

दरम्यानच्या काळात त्यांचा सदाभाऊ खोत यांच्याशी संपर्क सुरू असल्याचे कळाले. होते एकेकाळी मित्र असलेले सदाभाऊ व रविकांत तुपकर यांच्या शिरावर स्वाभिमानीची मदार होती. यापैकी सदाभाऊ भाजपच्या गळाला लागल्यामुळे ही जबाबदारी तुपकरांवर येऊन पडली होती. मात्र लोकसभेतील राजू शेट्टी यांच्या पराभवानंतर शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद वाढू लागला होता. त्यामुळेच की काय तुपकर यांना तोडून राजू शेट्टींचा गड उध्वस्त करण्याचा सदाभाऊंचा प्रयत्न दिसत होता. 

आज तुपकर यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे सदाभाऊंचा प्रयत्न सफल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या बरोबरीने त्यांचे साथीदार राणा चंदन यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा संस्थापक राजू शेट्टी यांच्याकडे पाठविला आहे. 

आज सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतला. भाजपने त्यांना काय कमिटमेंट केली किंवा ते सदभाऊ यांच्या संघटनेत जातात काय हेही पहावे लागणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com