रविकांत तुपकर 'नॉट रिचेबल'!

रविकांत तुपकर भाजपमध्ये गेले तर हा राजू शेट्टींसाठी मोठा धक्का असेल.
रविकांत तुपकर 'नॉट रिचेबल'!

पुणे : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे भाजपच्या गळ्याला लागल्याची आज सकाळपासून चर्चा आहे. याबाबत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते 'नॉट रिचेबल' आहेत.

रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीतील आक्रमक नेते आहेत. राजू शेट्टींच्या संघटनेत त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. 2014 पासून बुलडाणा लोकसभेसाठी ते इच्छुक होते, मात्र युती- आघाडयांच्या राजकारणात त्यांनी संधी मिळाली नाही. 2014 ला स्वाभिमानी भाजप- शिवसेनेसोबत होती, तर 2019 ला काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत होती. या दोन्हीवेळी तुपकरांना तयारी करूनही थांबावे लागले. राष्ट्रवादीने विधानसभेची जागा सोडण्याचा शब्द दिला होता, मात्र तो पाळण्यात आलेला नाही. संधी मिळत नसल्याने तुपकर गेल्या काही दिवसांपासून नाराज अवस्थेत आहेत. याची कुणकुण लागल्यानंतर भाजपने तुपकरांना खेचण्यासाठी व्यूहरचना केली आहे. त्यातूनच आज तुपकरांची गिरीश महाजनांसोबत भेट झाल्याची माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com