रविकांत तुपकर थोड्याच वेळात सदाभाऊंना धक्का देणार

आज सकाळी तुपकरांची राजू शेट्टी यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर ते कोल्हापूरला रवाना झाले.
रविकांत तुपकर थोड्याच वेळात सदाभाऊंना धक्का देणार

पुणे: दोन आठवड्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून रयत क्रांती संघटनेचा झेंडा खांद्यावर घेतलेले स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे थोड्या वेळात धक्कादायक राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे.

गेली आठ दहा वर्षापुर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे रवीकांत तुपकर लोकसभा निवडणुकीपासून अस्वस्थ होते. त्यांना राजकीय भवितव्याची चिंता लागून राहिली होती. ते स्वाभिमानीत अस्वस्थ असल्याचे पाहून भाजपने त्यांच्याशी संपर्क वाढवला होता. वाटाघाटीनंतर तुपकरांचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता. यासंदर्भाने त्यांनी आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र तुपकरांनी भाजपमध्ये न येता राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेश करून भाजपसाठी काम करावे, अशी सूचना फडणवीस यांनी केली. त्यानुसार तुपकर हे रयत क्रांती संघटनेत आले, मात्र प्रवेशानंतर ते स्तब्ध आहेत. फर्डे वक्ते असलेल्या तुपकरांनी भाजपसाठी एकही सभा घेतलेली नाही. भाजपकडूनही आपल्याला फसवले गेलेय, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यामुळे ते रयत क्रांती सोडून पुन्हा स्वगृही परतणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com