भाजप? छे! रविकांत तुपकर यांचा सदाभाऊंच्या रयत संघटनेत शनिवारी प्रवेश

भाजप? छे!  रविकांत तुपकर यांचा सदाभाऊंच्या रयत संघटनेत शनिवारी प्रवेश

पुणे : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन माजी खासदार राजू शेट्टी यांची साथ सोडली. त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण भाजप प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्षात ते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत शेतकरी संघटनेशी घरोबा करणार असल्याचे समजते आहे.

शेट्टी आणि खोत यांच्या वादात तुपकर हे शेट्टी यांच्या बाजून राहिले. खोत यांची संघटनेतूल हकालपट्टी करण्यात तुपकर यांची महत्त्वाची भूमिका होते. तेच तुपकर आता खोत यांच्याशी सहकार्य करण्याच्या तयारीत आहेत. खोत यांनी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब येथे उद्या (शऩिवारी) बोलविली आली आहे.  तुपकर यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

या कार्यक्रमात अन्य संघटनेतील नेत्यांच प्रवेश होणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे. हे इतर नेते म्हणजे तुपकर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

तुपकर हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली किंवा बुलढाणा या विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपात चिखलीची जागा भाजपकडे जाऊ शकते. बुलढाण्याच्या जागेवर शिवसेना हक्क बजावू शकते. शिवसेनेचा हा दावा खोडण्यासाठी बुलढाण्याची जागा युतीच्या मित्रपक्षासाठी म्हणजे रयत शेतकरी संघटनेला सोडण्याची रणनीती आहे. मग शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून तुपकर यांना संधी मिळू शकते, असे या मागचे गणित आहे. 

ही जागा रयत शेतकरी संघटनेसाठी म्हणून देण्यात येणार असली तरी मित्रपक्षांच्या उमेदवारांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे तुपकर हे भाजपचे उमेदवार म्हणूनच रिंगणात उतरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

शेट्टी आणि खोत यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार टीकाटिप्पणी सुरू झाली होती. खोत यांना सत्तासुंदरीचा मोह झाल्याची टीका तेव्हा झाली होती. ही टीका करणाऱ्या तुपकर यांच्याकडे तेव्हा वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद होते. शेट्टी यांनी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर तुपकर हे सत्तेचे तूप सोडणार का, असा सवाल खोत यांच्या गटातून केला गेला होता. तुपकर यांनीही मला सत्तासुंदरीचा मोह नसल्याचे सांगत पदाचा राजीनामा दिला होता. आता त्याच खोत यांनी तुपकर यांना पुन्हा सत्तासुंदरीच्या वर्तुळात आणले आहे. वंचितचे पडळकर आणि तुपकर या दोघांना भाजपमध्ये आणण्याची जबाबदारी खोत यांच्यावर होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com