कुरबुरीला कंटाळून बाहेर पडलेले रविकांत तुपकर पुन्हा स्वगृही

स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील अंतर्गत कुरबुरीला कंटाळून संघटना सोडली, ही माझी मोठी चूक होती. सरकारवर शेतकऱ्यांचा वचक ठेवण्यासाठी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या रविकांत तुपकर यांनी आज स्वगृही प्रवेश करून खळबळ उडवली.
Ravikant Tukpar
Ravikant Tukpar

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील अंतर्गत कुरबुरीला कंटाळून संघटना सोडली, ही माझी मोठी चूक होती. सरकारवर शेतकऱ्यांचा वचक ठेवण्यासाठी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांच्या तरूण मुलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन करत स्वाभीमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या रविकांत तुपकर यांनी आज स्वगृही प्रवेश करून खळबळ उडवली. तुपकर यांनी काही दिवसापूर्वी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला होता. संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी पुन्हा स्वाभीमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. 

तुपकर म्हणाले, ''संघटनेतून बाहेर पडणे ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. शेतकऱ्यांनी मला माफ करावे. येथून पुढे चळवळीच्या सगळ्या आंदोलनात सक्रीय राहून शेतकऱ्यांसाठी अधिक आक्रमकतेने आंदोलने केली जातील. चळवळ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रेम काय असत हे कळाले. राज्यभरातून शेतकऱ्यांनी घरी येवून पुन्हा स्वभिमानीत सक्रीय होण्याची विनंती केली. संघटनेत अंतर्गत कुरबरी वाढल्या होत्या. मला पदाचा कोणताही लोभ नव्हता आणि नाही. शेट्टी यांनी सांगूनही कुरबुरी थांबत नव्हत्या. यामुळे संतापाने मी राजीनामा दिला. माझा शेट्टी यांच्याबाबत कधीच आकस नव्हता. कोणत्याही संघटनेत गेलो तरी शेट्टींवर टीका केली नसती. पक्ष सोडला म्हणून कधीही त्यांचवर टीका केली नाही. संघटनेचे कोल्हापूरातील संघटनेचे सागर चिपरगे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी त्यांच्या घरी गेलो असता अनेक कार्यकत्यांनी भावनिक साद घातली. अखेर चळवळ महत्वाची मानून मी स्वगृही परतलो आहे. येथून पुढील संघटनेच्या उमेदवाराबरोबरच कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराला वेगाने सुरवात करणार आहे.''
 
शेट्टी म्हणाले, ''संघटनेतील एखादा सदस्य नाराज असल्यास त्याची समजूत घालणे हे कुटुंब प्रमुखाचे काम आहे. ते काम मी केले. तुपकर बाहेर गेल्यानंतर मलाही धक्का बसला होता. संघटनेत काही ताणतणाव आहेत. पण सध्याची परिस्थिती पहाता हे अंतर्गत वाद मिटवून आम्ही तुपकरांच्या साथीने पुन्हा चळवळ जोरदार करु.'' यावेळी प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, अनिल पवार आदिसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com