तंत्रनिकेतनचा कोटा कमी केल्याने आमदार रवी राणांच्या घरावर धडकले विद्यार्थी

 तंत्रनिकेतनचा कोटा कमी केल्याने आमदार रवी राणांच्या घरावर धडकले विद्यार्थी

अमरावती : अभियांत्रिकी प्रवेशासाठी तंत्रनिकेतनचा कोटा 10 टक्‍क्‍यांनी घटविल्याच्या निषेधार्थ काल विद्यार्थ्यांनी आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानावर धडक दिली. 20 टक्के कोटा कायम ठेवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आणि त्यांनी निवेदनही दिले. तंत्रनिकेतनमधून उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला 20 टक्के कोट्यातून हमखास प्रवेश मिळेल, या अपेक्षेने विद्यार्थ्यांनी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अभियांत्रिकी प्रवेशाचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद होणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षात तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी पासआऊट होऊन त्यांचे अभियांत्रिकीची प्रवेश निश्‍चित होत नाहीत, तोपर्यंत उपरोक्त निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अशी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आदित्य साखरे, पवन गावंडे, प्रणीता दातीर, यश माकोडे, श्रद्धा खराटे, ज्योती नेमाडे, महिमा पोफळे, आचल मेश्राम, तेजस भगत, नरेंद्र शेरेकर, श्रीधर मेंढे, प्रणव जयसिंगपुरे, ऋषिकेश जाधव तथा शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. 

अभियांत्रिकी प्रवेशाचा 20 टक्के कोटा कायम न ठेवल्यास उपोषणाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पॉलिटेक्‍निक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जातो. त्यासाठी 20 टक्के जागा आरक्षित असतात. मात्र सरकारने यावर्षी खासगी शिक्षण संस्था चालकांचे हित जोपासण्यासाठी तो कोटा घटवून केवळ दहा टक्केच ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. यासंदर्भात मंत्रालयात बैठक लावण्यात येईल. खासदार नवनीत राणा यांच्या माध्यमातून हा मुद्दा केंद्रसरकारकडे लावून धरू. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही आमदार रवी राणा यांनी विद्यार्थ्यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com