`दिवाळी मिलना'त राणा-बूब यांच्यात हाणामारी

बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यात आज थेट वृद्धाश्रमात शाब्दिक वाद झाला. या वादाच रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यात राणा व बुब कार्यकत्यांसह आपआपसांत भिडले. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्या मारून फेकल्या. ही घटना बडनेराजवळील मधूबन वृद्धाश्रम मध्ये घडली.
`दिवाळी मिलना'त राणा-बूब यांच्यात हाणामारी

अमरावती : बडनेराचे आमदार रवी राणा आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश बुब यांच्यात आज थेट वृद्धाश्रमात शाब्दिक वाद झाला. या वादाच रूपांतर नंतर हाणामारीत झाले. यात राणा व बुब कार्यकत्यांसह आपआपसांत भिडले. दोन्ही कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुर्च्या मारून फेकल्या. ही घटना बडनेराजवळील मधूबन वृद्धाश्रम मध्ये घडली.

आज सकाळी दिवाळी निमित्त वृद्धाश्रमात असलेल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी दिवाळी मिलन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्याने दोघेही नेते आमने-सामने आलेत व वादाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. या नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारायला सुरुवात केली. मात्र आपल्या वृद्धाश्रमात नेमका हा काय प्रकार  सुरु आहे हे मात्र वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांच्या समजण्यापलीकडी होते. त्यामुळेवृद्ध ही  काही काळ अस्वस्थ होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नगरसेवक दिनेश बुब यांनी खासदार नवनीत राणा यांचा अपप्रचार केल्याचा आरोप बडनेऱ्याचे आमदार राणा यांनी केला. खासदारांचा वारंवार होत असलेला अपमान आपण सहन करणार नाही असेही राणा यावेळी म्हणाले.

राणा हे आपल्या अंगावर चालून आलेत तर आपण महिल्यांच्या सुरक्षेतेसाठी शहरात हेल्पलाईन चालवितो. आपण नेहमीच महिलांचा आदरच करतो. मी महिलांबद्दल चुकीचं वक्त्यव्य केलेलेच नाही तर गेल्या २० वर्षांपासून या ठिकाणी आपण आपल्या कार्यकर्त्यांसोबत वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे वादाला नेमकी सुरुवात कश्यामुळे झाली याचा तपास आता पोलीस करत आहे. 

या दोन्ही नेत्यांनी आजचा दिवस कोणता, आपण कुठे एकमेकांबद्दल भांडत आहे याच भान ठेवायला पाहिजे होते अश्या प्रतिक्रिया आता वृद्ध  देत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com