शिवसेनेचे मदत केंद्र शेतकरी आणि सरकारमधील दुवा ठरतील - दिवाकर रावते

शिवसेनेचे मदत केंद्र शेतकरी आणि सरकारमधील दुवा ठरतील - दिवाकर रावते

औरंगाबाद : शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली मदत केंद्र ही शेतकरी आणि सरकारमधील दुवा ठरतील. या माध्यमातून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शिवसेना योग्य ती मदत करेल असा विश्‍वास शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दिला. राज्यात व मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सरकार नसतांना बळीराजावर ओढावलेल्या या संकटात त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शिवसेनेने ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू करून केला आहे. गंगापूर तालुक्‍यातील अमंळनेर येथील शेतकरी मदत केंद्राला दिवाकर रावते यांनी आज भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

शेतकऱ्यांचा हातातोडांशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असला तरी शिवसेना संकटाच्या काळी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे रावते यांनी यावेळी सांगितले. ही मदत केंद्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आली आहेत. किंबहुना शेतकरी आणि शासनामधील एक महत्वाचा दुवा म्हणून ही मदत केंद्र काम करतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देईल असा शब्द देखील रावते यांनी उपस्थित शेतकऱ्यांना यावेळी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com