Raut, Minister Awadh's statement strongly condemns the statement | Sarkarnama

राऊत, मंत्री आव्हाडांच्या वक्तव्याचा साताऱ्यात निषेध 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सातारा : शिवसेनेचे खासदार संजय राऊत व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज उदयनराजे समर्थकांनी सातारा शहरात बंद पाळून श्री. राऊत व मंत्री आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या गाढवाच्या गळ्यात त्या दोघांच्या नावाचे फलक लावून धिंड काढली. 

सकाळी सातारा शहरातून मोटारसायकलवरून रॅली काढून उदयनराजे समर्थकांनी सातारा शहरातील नागरिकांना बंदचे आव्हान करत सातारा शहरातून निषेध मोर्चा काढला. यामध्ये मोठ्यासंख्येने उदयनराजे समर्थक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

मोर्चा पोवईनाक्‍यावर आल्यावर तेथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच गाढवाच्या गळ्यात त्या दोघांच्या नावाचे फलक लावून धिंड काढली. 

अत्यावश्‍यक सेवा वगळता सातारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या आंदोलनात नगराध्यक्ष माधवी कदम, सुनील काटकर, किशोर शिंदे, दत्तात्रेय बनकर, अविनाश कदम, संदीप शिंदे, अर्चना देशमुख, सुजिता राजेमहाडिक, सविता फाळके, अनिता घोरपडे, निशांत पाटील, रवी साळुंखे, सातारा व नगरविकास आघाडीचे नगरसेवक व तसेच मोठ्यासंख्येने उदयनराजे समर्थक उपस्थित होते. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख