गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टेंचा कारागृहातून विजयी चौकार

गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टेंचा कारागृहातून विजयी चौकार


परभणी :  अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी विजय संपादन केला आहे. शिवसेनेचे विशाल कदम यांनाच 18 हजार मतांनी पराभव करून गुट्टे यांनी कारागृहातूनच विजयाचा चौकार लगावला आहे.

संपूर्ण राज्याचे गंगाखेड विधानसभेकडे लक्ष लागले होते. या ठिकाणी बहुरंगी लढत झाली. शिवसेनेचे विशाल कदम, राष्ट्रवादी कॉग्रेसचे डॉ.मधुसुदन केंद्रे, अपक्ष संतोष मुरकुटे, अपक्ष सीताराम घनदाट या दिग्गजांशी रत्नाकर गुट्टे यांनी काट्याची लढत दिली. गंगाखेडची जागा महायुतीत शिवसेनेला सुटल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रासपनेही या ठिकाणी रत्नाकर गुट्टे यांना या ठिकाणावरून पक्षाच अधिकृत एबी फॉर्म दिला होता.
 रत्नाकर गुट्टे हे कर्ज फसवणुक प्रकरणात सध्या परभणीच्या जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या माघारी त्यांच्या नातेवाईकांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. रत्नाकर गुट्टे यांना विजयी करण्यासाठी समर्थकांनी जीवाचे रान केले. अखेर अटीतटीच्या लढतीत रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांचा 18 हजार मतांनी पराभव करीत विजयाचा चौकार मारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com