आमदार रत्नाकर गुट्टेही पंकजा मुंडेंसाठी राजीनामा देण्यास तयार 

पंकजा यांच्या पराभवाने आपण व्यथीत झालो असून समर्थकांनी माझ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू नये. -आमदार रत्नाकर गुट्टे
munde-gutte.
munde-gutte.

परभणी :  परळी मतदार संघातून पराभव स्विकारावा लागलेल्या भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे  यांच्यासाठी आता गंगाखेड मतदार संघातील रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे देखील त्यांच्या पदाचा राजीनामा देण्यास तयार झाले आहेत. 

गंगाखेड मतदार संघातून पंकजा यांनी निवडणुक लढवावी त्या मताधिक्यांनी निवडून येतील असे आमदार गुट्टे यांच्यावतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई राजेभाऊ फड यांच्यावतीने हे पत्रक काढण्यात आले आहे.

या पत्रकात म्हंटले आहे की, राज्यातील जनतेसाठी संघर्षातून त्यांच्या प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांचा पराभव माझ्यासाठी अंत्यत दुर्देवी घटना आहे. पंकजा मुंडे व महादेव जाणकर हे माझे आधारस्तंभ आहेत.

पंकजा मुंडे साठी आपण गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार असून पंकजा निश्चितच या मतदार संघातून मताधिक्यांनी विजयी होतील असा मला विश्वास असल्याचे त्यांनी व्यक्त केला आहे.

 पंकजा यांच्या पराभवाने आपण व्यथीत झालो असून समर्थकांनी माझ्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करू नये असे त्यांनी या
पत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com