ratnakar gaikawad | Sarkarnama

गायकवाड मारहाणीचे राज्यभरात पडसाद

संजीव भागवत: सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई : राज्याचे माहिती आयुक्‍त रत्नाकर गायकवाड व त्यांच्या पत्नींना औरंगाबाद येथे झालेल्या मारहाणीचा राज्यभर निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक अधिकारी-कर्मचारी असोसिएशनने यासंदर्भात एक पत्रक काढून या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्‍त केला आहे. 

औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात राज्य माहिती आयुक्‍त रत्नाकर गायकवाड यांना भारिप बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली असूल या मारहाणीच्या विरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.लोकशाहीमध्ये कोणत्याही बाबीसाठी आपली भूमिका मांडण्याची सर्वांना आहे. एखाद्या गोष्टीबद्दल अन्याय झालेला आहे, असे वाटत असेल तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागता येते, असे असताना एका कार्यक्षम आणि घटनात्मक पद धारण करणाऱ्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला अनुसरून मानवी मुल्यांचे अनुकरण करणाऱ्या रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या पत्नीवर हल्ला करून मारहाण करणे हे लोकशाहीवर विश्‍वास नसलेल्या लोकांचे कृत्य असल्याचे सांगत असोसिएशनचे अध्यक्ष हाजी सैपन जतकर यांनी तीव्र शब्दात आपला निषेध नोंदविला आहे. 

गायकवाड यांचे प्रशासकीय कामकाज आणि माहिती आयुक्‍त म्हणून केलेले काम, त्यासाठी केलेल्या अनेक लोकोपयोगी निर्णय हे महत्वाचे ठरले असून अशा व्यक्‍तीला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. डेव्हिड थॉमस अल्वारिस, सरचिटणीस सलीम बागवान यांनी काढलेल्या पत्रकातून केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख