रत्नागिरी जिल्ह्यात भाजपमधील बंडोखोरांची तलवार म्यान

..
jadhav-kadam
jadhav-kadam

रत्नागिरी :  दापोली-खेड-मंडणगड, गुहागर, चिपळूण-संगमेश्‍वरसह राजापूर मतदारसंघातील भाजपच्या बंडखोरांनी तलवारी म्यान केल्याने शिवसेनेच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.  बंडखोरीमुळे जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीतील गढूळ झालेले वातावरण निवळले आहे.


जिल्ह्यातील पाचही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने भाजपकडून चार मतदारसंघात बंडाचे निशाण फडकवले होते. रत्नागिरी वगळता दापोली-खेड, गुहागर, चिपळूण, राजापुरात त्याचे पडसाद उमटले. गुहागर मतदारसंघात भाजपचे रामदास राणे अपक्ष म्हणून रिंगणात होते.

येथे शिवसेनेकडून भास्कर जाधव उभे आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणबी कार्ड वापरण्यात आल्याने जिल्हापरिषद शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्याकडून चांगली लढत अपेक्षित आहे. रामदास राणेंनी अपक्ष अर्ज मागे घेतल्याने जाधवांचा मार्ग सुकर झाला आहे.


दापोलीत भाजपचे निष्ठावंत केदार साठेंच्या अपक्ष अर्जामुळे शिवसेनेचे योगेश कदमांची अडचण निर्माण झाली होती. विद्यमान आमदार संजय कदम यांना लढत देण्यासाठी भाजपची साथ आवश्यक आहे. साठेंच्या माघारीचा फायदा कदमांना होईल.

चिपळुणातून रिंगणात उतरलेल्या भाजपचे तुषार खेतलांनीही माघारीचा निर्णय घेतला आहे. राजापूरमध्ये रिंगणात उतरलेल्या भाजप कार्यकर्ते संतोष गांगण, प्रसाद पाटोळे यांनीही माघार घेतल्याने शिवसेनेच्या राजन साळवींचा मार्ग सुकर झाला.

तरीही काँग्रेसच्या कुणबी कार्डमुळे साळवींना चुरशीच्या लढतीला सामोरे जावे लागणार आहे. बंडखोरांनी तलवारी म्यान केल्याने शिवसेनेची अर्धी अधिक डोकेदुखी दूर झाली आहे; मात्र त्या उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग किती राहील यावर पुढील गणित अवलंबून राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com