मागठाण्यात रश्‍मी ठाकरेंनी न बोलता प्रचारसभा जिंकली ! - Rashmi Thakare win the meeting without giving speech | Politics Marathi News - Sarkarnama

मागठाण्यात रश्‍मी ठाकरेंनी न बोलता प्रचारसभा जिंकली !

सरकारनामा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

..

मुंबई :  रश्‍मी ठाकरे निवडणुकांदरम्यान नेहमीच उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाहीर सभांना हजेरी लावतात; मात्र शक्‍यतो एकट्याने जाहीर प्रचारसभांना त्या जात नाहीत. तरीही मागठाण्यातील सभेला रश्‍मी ठाकरे यांना आलेल्या पाहून शिवसैनिकांना त्याचे अप्रूप वाटत होते.

मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत या वेळी आपला आनंद व्यक्त केला.  त्यामुळे रश्‍मी ठाकरेंनी न बोलता प्रचारसभा जिंकली अशीच चर्चा  रंगली . 

 शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे; तसेच भोजपुरी अभिनेता रवी किशन यांनी बुधवारी रात्री मागठाण्याचे शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्या प्रचारासाठी हजेरी लावली.

त्यांच्या उपस्थितीत मनसे, कॉंग्रेस आदी पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रश्‍मी ठाकरे यांनी सभेत भाषण केले नसले तरी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  रश्‍मी ठाकरे यांनी रात्री झालेल्या सभेस हजेरी लावली. या वेळी भाजप नेते राम नाईक यांनी केंद्र सरकारच्या लोकोपयोगी धोरणांची माहिती दिली. काश्‍मीरचे वेगळेपण दाखविणारे कलम 370 रद्द करणे गेल्या सत्तर वर्षांत कोणालाही जमले नव्हते, असे ते म्हणाले. तर सुर्वे यांनीही गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती देऊन यापुढेही अशीच कामे करण्याचा निर्धार बोलून दाखवला.  

गोरखपूरचे खासदार व अभिनेते रवी किशन यांनी संध्याकाळी सुर्वे यांच्यासाठी रोड शो घेतला. या वेळी विशेषकरून उत्तर भारतीय मतदारांना त्यांनी सुर्वे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. "मला प्रचारासाठी येथे येण्यास भाजप श्रेष्ठींनीच सांगितले. सुर्वे यांना राज्यातील भाजप श्रेष्ठींचाही भक्कम पाठिंबा आहे. सुर्वे यांची येथे कामे असल्याने ते नक्कीच दुसऱ्यांदा विजयी होतील', असा विश्‍वास रवी किशन यांनी रोड शो दरम्यान व्यक्त केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख