रामदास आठवले म्हणतात, `रश्‍मी ठाकरे हुशार आहेत; त्यांनी दोन्ही कॉंग्रेसशी सामना करावा'

रश्‍मी ठाकरे या अत्यंत हुशार आहेत. उद्धव ठाकरेंच्या त्या खंबीर पाठीराख्या आहेत. आता त्या `सामना'च्या संपादक झाल्या आहेत. मात्र त्यांनी आमच्याशी सामना करु नये. त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी सामना करावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.
rashmi thackeray is brilliant says ramdas athawale
rashmi thackeray is brilliant says ramdas athawale

नाशिक - रश्‍मी ठाकरे या अत्यंत हुशार आहेत. उद्धव ठाकरेंच्या त्या खंबीर पाठीराख्या आहेत. आता त्या `सामना'च्या संपादक झाल्या आहेत. मात्र त्यांनी आमच्याशी सामना करु नये. त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी सामना करावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे केले.

श्री. आठवले आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी रश्‍मी ठाकरे `सामना'च्या संपादक झाल्यात. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, खासदार संजय राऊत हे "सामना'चे कार्यकारी संपादक आहेत. यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सामनाचे संपादक होते. त्यामुळे उद्धव ठाकरे संपादक होतील असे वाटले होते. मात्र कदाचीत ते राज्याचे मुख्यमंत्री असल्याने त्यांनी ही जबाबदारी रश्‍मी ठाकरे यांच्याकडे सोपविली असावी. त्या हुशार आहेत. त्यांनी सदैव उद्धव ठाकरे यांना खंबीर साथ दिली आहे. त्या उद्धव ठाकरेच्या खंबीर पाठीराख्या आहेत. मात्र त्यांनी आमच्याशी सामना करु नये. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी सामना करावा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे भारतीय जनता पक्षाबरोबर जातील काय? या प्रश्‍नावर देखील त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला मनसे सोबत जाण्याची गरज नाही. मी असे पर्यंत तसे होऊ देणार नाही. मात्र "मनसे'ने आपले धोरण बदलले तर भाजपला विचार करता येईल. त्याविषयी मी काही सांगू शकत नाही.

सर्व जातींची जनगणना व्हावी
श्री. आठवले यांनी "ओबीसी' घटकाची स्वतंत्र जनगणना व्हावी यासंदर्भात देखील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केवळ ओबीसी नव्हे तर सर्व जातींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे त्या त्या समाजघटकाला आरक्षण व अन्य सुविधांविषयी नेमकेपणाने निर्णय घेने सरकारला शक्‍य होईल. याबाबत मी 2000 मध्ये संसदेत तशी भूमिका मांडली होती. आताही मी तसा आग्रह धरणार आहे. मी केंद्र सरकारचा मंत्री आहे. त्यादृष्टीने नक्की संबंधीतांशी चर्चा करीन असे सांगितले.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर, अविनाश महातेकर आणि नाशिकचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com