'आदिनाथ' व 'मकाई'ला गतवैभव मिळवून देणार : रश्‍मी बागल 

..
'आदिनाथ' व 'मकाई'ला गतवैभव मिळवून देणार : रश्‍मी बागल 

करमाळा  : आमच्यावर टीका करण्यासाठी त्यांच्याकडे कारखान्यातील कामगारांच्या पगाराशिवाय दुसरा कुठलाच मुद्दा नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार एकाच मुद्याला धरून प्रचार केला जात होता.

परंतु, काल करमाळ्यात झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः कारखान्यांच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घातले असून, पुढील दोन-तीन महिन्यांत कारखान्यांच्या सर्व अडचणी दूर करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे मत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार रश्‍मी बागल यांनी व्यक्त केले. 

कारखान्यांच्या एकाच प्रश्‍नावरून वारंवार होत असलेल्या टीकेला उत्तर देताना रश्‍मी बागल बोलत होत्या. आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही कारखाने आमची प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे काहीही झाले तरी दोन्ही कारखान्यांना गतवैभव मिळून देणारच, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

बागल म्हणाल्या, जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यावर कारखान्याच्या सर्व अडचणी सोडविण्याची जबाबदारी पक्षप्रमुखांनी दिली आहे. प्रा. सावंत यांनी देखील पुढील दोन-तीन महिन्यांत आदिनाथ आणि मकाई या दोन्ही कारखान्यांच्या सर्व अडचणी सोडवून, कारखान्यांचे युनिट चांगल्या प्रकारे चालविणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही कारखाने आता नव्या दमाने सुरू करण्यात येणार आहेत. 


बागल म्हणाल्या,स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी कारखान्यांचे भांडवल करून कामगारांना वेठीस धरण्याचे पाप विरोधकांनी केले. कारखान्याची आणि कामगारांची एवढीच काळजी असती, तर अडचणीच्या काळात कारखान्याला सोडून पळ काढला नसता.

संचालकांच्या फोडाफोडीचे कारस्थान केले नसते. आम्ही पळून जाणाऱ्यांमधील नाही. आम्ही शेवटपर्यंत कामगारांच्या हितासाठीच प्रयत्न करणार. आमच्या प्रयत्नांना यश देखील आले आहे. कामगार बंधूंना, पुढील दोन-तीन महिन्यांत आपल्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत,असे रश्‍मी बागल,  म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com