उदगीरला नगरसेविकेच्या पतीचा विवाहितेवर बलात्कार

उदगीर नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा जुबेर मिर्झा याचे पती अक्रम मिर्झा यांनी शहरातील गांधिनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सन 2014 पासून ते 2019 पर्यंत अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने पाच वर्षे बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.
Case of Rape Registered Against Udgir Women Corporator Husband
Case of Rape Registered Against Udgir Women Corporator Husband

उदगीर (जि. लातूर)  : देशभरात सध्या बलात्कार घटनांच्या चर्चा सुरू असतानाच उदगीरात नगरसेवक पतीने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून शहर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उदगीर नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा जुबेर मिर्झा याचे पती अक्रम मिर्झा यांनी शहरातील गांधिनगर येथे राहणाऱ्या एका विवाहितेवर सन 2014 पासून ते 2019 पर्यंत अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल करून बदनामी करण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने पाच वर्षे बलात्कार केला. शिवाय याबाबतीत कुणाला जर माहिती सांगितली तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन वारंवार बलात्कार करत असल्याची फिर्याद पीडित विवाहितेने शहर पोलिसात दिली. 

त्यावरुन शुक्रवारी (ता.6) रात्री अकरा वाजता आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी अक्रम मिर्झा यास रात्रीच अटक करण्यात आलेली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर, शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची पोलीस उपनिरीक्षक व्हि. आय. एडके अधिक तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com