Raosaheb Danve's freindship with Hamad bhai | Sarkarnama

तीस वर्षांपासून रावसाहेब दानवेंचा 'याराना' शेख हमदभाईंशी

तुषार पाटील
रविवार, 5 ऑगस्ट 2018


 गेल्या तीस वर्षांपासून  रावसाहेब दानवे यांचे  सकाळी मॉर्निंग वॉकचे सोबती म्हणून अख्खे भोकरदन त्यांना ओळखते .  ते रावसाहेब दानवेना गावातील राजकिय घडामोडींची नियमित माहिती देतात. रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्याशेजारी हमद भाई राहतात.

भोकरदन जि. जालना :  राजकारणी लोक संबंध जपतात पण फायद्यासाठी असे आपण म्हणतो . मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अनोखी मैत्री जपली आहे .

भोकरदन येथे पान टपरी चालवणारे  शेख हमद यांच्याशी असलेला स्नेह रावसाहेब दानवे  यांनी राजकारणात यशाची शिखरे एका पाठोपाठ एक सर करतानाही कायम राखला आहे . 

रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्याशेजारी हमद भाई राहतात. गेल्या तीस वर्षांपासून  रावसाहेब दानवे यांचे  सकाळी मॉर्निंग वॉकचे सोबती म्हणून अख्खे भोकरदन त्यांना ओळखते .  ते रावसाहेब दानवेना गावातील राजकिय घडामोडींची नियमित माहिती देतात त्यांचा बोलण्याचा अंदाज देखील एकदम फिल्मी व मनोरंजक आहे.रावसाहेब दानवे यांनी त्यांना 'आज तक' नावाने संबोधतात.

मतदारसंघातील दौऱ्यात दानवेंच्या गाडीत एक जागा राखीव असते ती हमद भाईसाठी. दानवे दिल्ली, मुंबई व इतर ठिकाणी  असतांना देखील रावसाहेब दानवे हमद भाई यांच्या कडून मतदारसंघातील हालहवाल घेत असतात.भाजप अध्यक्ष अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासह जळगावचे खासदार ए टी पाटील या सर्वांना हमद भाई यांनी गप्पांची मैफील रंगल्यावर आपल्या राजकीय किस्स्यांनी  गदागदा हसवले आहे.

हमद भाई दानवेंच्या दिल्ली,मुंबई येथील निवासस्थानी जाऊन आले असून तेथील कर्मचारी,ड्रायवर देखील हमद भाईचे चाहते झाले आहे.
दानवेंशी त्यांची घनिष्ठ मैत्री असली तरी त्या माध्यमातून हमद भाई यांनी कुठलंही राजकीय पद अथवा आर्थिक फायदा घेतलेला  नाही.आजही ते नवीन भोकरदन भागात 'याराना' पान सेन्टर चालवतात.

दहा बाय तीस च्या साध्या पत्राच्या घरात ते राहतात. मात्र रावसाहेब दानवे आजही प्रत्येक ईदला हमदभाईना घरी जाऊन शुभेच्छा देतात.हमद भाई यांच्या घरचे नॉनव्हेज दानवेंच्या खास आवडीचे भोजन.दानवे कुठेही असले तरी दिवसातून एकदा तरी हमद भाई यांच्याशी त्यांचा संवाद होतोच.अनेक राजकीय नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते तर दानवेंचे लोकेशन हमद भाईनाच विचारतात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख