शिवसेनेने युती तोडलेली आहे: दानवे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या फॉर्म्युल्यानुसारच आजवर युती टिकून आहे.
शिवसेनेने युती तोडलेली आहे: दानवे

नांदेड : मराठवाड्याच्या प्रश्नांकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत असल्याने या भागाचा विकास होऊ शकला नाही. परिणामी मराठवाड्याचे काय प्रश्‍न आहेत, यावर सर्व आमदार, खासदारांनी एकत्रित येऊन चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दानवे आज जिल्हा दौऱ्यावर होते. अर्धापूर तालुक्‍यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या. त्यानंतर दानवे बोलत होते.

भाजप- शिवसेना एकत्र लढले. जनतेनेही महायुतीला बहुमत दिले. जनादेशाचा आदर भाजपसह मित्रपक्षांनी केला पाहिजे; पण असे न करता शिवसेनेने निकालाच्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन "अन्य पर्याय मोकळे आहेत,' असे जाहीर करून टाकले. त्यांचा एकच हट्ट आहे, तो म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा. वास्तविक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या फॉर्म्युल्यानुसारच आजवर युती टिकून आहे. शिवसेनेने युती तोडलेली आहे, आम्ही तोडली नाही, असेही दानवे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com