raosaheb-danve-uses-new-funda- | Sarkarnama

भाजपचा प्रचाराचा फंडा : रावसाहेब दानवे यांची सपत्नीक नारळ- खारीक तुला

तुषार पाटील
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

आधी रावसाहेब दानवे यांच्या वजना इतक्‍या खारका एका पारड्यात टाकण्यात आल्या. माप स्थिर झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि खारीक तुला पार पडली.

भोकरदन:  मकरसंक्रांती निमित्त साधून भाजपच्या महिला नगरसेवकांनी  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि त्यांच्या  त्यांच्या पत्नीची नुक्रमे खारीक आणि नारळ तुला करत संक्रांतीचे वाण लुटले. 

कधीगावातून घोड्यावरची रपेट, तर कधी बुलेटवरून फेरफटका. हे कमी की काय? म्हणून निवडणुकीत विजयी हत्तीवरून मिरवणूक असे विविध फंडे वापरून  रावसाहेब दानवे नेहमीच चर्चेत राहिले. आता ते चर्चेत आले आहेत नारळ - खारकांच्या तुलनेने !

अशाच उत्साहाच्या भरात भाजपच्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष आशा माळी यांच्यासह इतर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी भोकरदनमध्ये आज (ता.18) रावसाहेब दानवे यांची सपत्नीक खारीक-नारळ तुला केली. निमित्त होते सिमेंट रस्त्याच्या लोकार्पणाचे. 

या सोहळ्यास लोकांनी मोठी गर्दी केली होती.  या तुला कार्यक्रमाला संपुर्ण दानवे कुटुंब हजर होते. दुपारी भोकरदन शहरात आधी रावसाहेब दानवे यांच्या वजना इतक्‍या खारका एका पारड्यात टाकण्यात आल्या.

माप स्थिर झाल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि खारीक तुला पार पडली. त्यानंतर निर्मला दानवे यांची महिलांनी नारळ आणि खणाने तुला केली आणि एकमेकांना हळदी कुंकू लावत वाण दिले. 

दानवे पती-पत्नींच्या वजना इतकी खारीक उपस्थितांमध्ये वाटून देण्यात आली तर खण आणि नारळ मकरसंक्रांतीचे वाण म्हणून महिलांना देण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख