khaire-danve-Jadhav.j
khaire-danve-Jadhav.j

दानवेंनी जावयासाठी नव्हे तर खैरेंच्या विजयासाठीच प्रयत्न केले :  आ.  ठाकूर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. -सुजितसिंह ठाकूर

मुंबई :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव यांच्या विजयासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले," असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी केला.

श्री. ठाकूर म्हणाले ,"औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्या विजयासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांनी प्रयत्न करत युतीधर्माचे पालन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांच्या सूचनेवरून मी  स्वतः या मतदारसंघात तीन दिवस मुक्काम केला . मी   खैरे यांच्या विजयासाठी भाजपा नेते, कार्यकर्त्यांशी संपर्क करून पत्रकार परिषद घेऊन जाहीर आवाहनही केले होते."

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई आ. हर्षवर्धन जाधव या मतदारसंघात उमेदवार आहेत. जाधव यांना प्रदेशाध्यक्षांचा पाठिंबा असल्याचा गैरसमज काही जणांनी निर्माण केला होता. मात्र आपण पत्रकार परिषदेत जाहीरपणे पक्षाची भूमिका स्पष्टपणे मांडली आणि संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com