बावधनच्या पाणी प्रश्नात रावसाहेब दानवे घालणार लक्ष 

बावधनच्या पाणी प्रश्नात रावसाहेब दानवे घालणार लक्ष 

पुणे : पुणे जिल्ह्यात भाजपचा पहिल्यांदा थेट सरपंच झालेल्या बावधन गावातील पाणीप्रश्‍नात लक्ष घालण्याचे आश्‍वासन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

पुण्यानजिक असलेल्या बावधन गावचा पाणी प्रश्न हा नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरोप- प्रत्यारोपांनी गाजला होता. जनतेतून थेट सरपंच निवडण्याची पहिली निवडणूक पुणे जिल्ह्यातयाच गावात पार पडली. भाजपच्या पियुषा किरण दगडे- पाटील या झाल्याने आता हा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी दानवे यांनी घेतली आहे. पियुषा या भाजपचे पुणे महापालिकेतील नगरसेवक किरण दगडे यांच्या पत्नी आहेत. 

किरण हे दानवे दानवे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत. दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे व किरण यांचीही मैत्री आहे. दानवे हे मंगळवारी पुण्यात कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांनी पीयूषा व किरण यांना बोलावून घेऊन त्यांचे अभिनंदन केले. 
यावेळी दानवे म्हणाले, ""बावधन बुद्रुक गावचे विविध प्रश्न सोडवा. गावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी काय मदत लागल्यास सांगा. तुमच्या गावातील पाणी प्रश्न सोडवू या. तुम्ही जिल्ह्यातील भाजपच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. हा विजय जिल्ह्यातील पुढील निवडणुकीत भाजपसाठी नक्कीच फायदा होईल.'' 

या निवडणुकीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. नगरसेवक किरण दगडे यांनी पालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला, असा आरोप आणि प्रचार विरोधकांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून किरण दगडे यांनी आम्ही सत्तेत आल्यावर महापालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मतदारांनी योग्य घेतला असल्याने दिलेले आश्‍वासन पाळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे दगडे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com