Raosaheb Danve Nashik Marriage Function News | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'खासदार साहेब लग्न तुमचे की मुलाचे' म्हणत दानवेंनी जीभ चावली 

संपत देवगिरे 
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

खासदार चव्हाण यांचे पुत्र आणि संतोष चव्हाण यांची कन्या वैशाली यांचा विवाह आज येथील श्रध्दा लॉन्स मंगल कार्यालयात झाला. यावेळी जिल्हाभरातील आदिवासी बांधव, राज्यभरातील विविध पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली. गेली अनेक वर्षे खासदार सफारी ड्रेस परिधान करतात. आज स्वागताला ते करड्या रंगाच्या सुटात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना भेटले तेव्हा त्यांनी आपल्या स्वभावाला साजेसा विनोद केला.

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे खसादार हरिश्‍चंद्र चव्हाण यांची पुत्र समीर यांचा विवाह आज थाटामाटात झाला. सर्वच पक्षांतील मोठ्या नेत्यांची मांदीयाळीच यावेळी होती. स्वागत कमानीजवळ सुटबुटातील खासदार चव्हाणांना खाली वर न्याहाळत हस्तांदोलन करता करता श्री. दानवे विनोदाने म्हणाले, "लग्न तुमचे की मुलाचे?"... या विनोदाला सगळ्यांनीच प्रचंड दाद दिली. मात्र, त्याचवेळी शेजारी खासदारांच्या सौभाग्यवतींना पाहुन दानवेंनी जीभ चावत हात जोडले. 

खासदार चव्हाण यांचे पुत्र आणि संतोष चव्हाण यांची कन्या वैशाली यांचा विवाह आज येथील श्रध्दा लॉन्स मंगल कार्यालयात झाला. यावेळी जिल्हाभरातील आदिवासी बांधव, राज्यभरातील विविध पक्षांचे नेत्यांनी हजेरी लावली. गेली अनेक वर्षे खासदार सफारी ड्रेस परिधान करतात. आज स्वागताला ते करड्या रंगाच्या सुटात होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना भेटले तेव्हा त्यांनी आपल्या विनोदी स्वभावाला साजेसा विनोद केला. खासदार चव्हाणांना खाली वर न्याहाळत ते मिश्‍कीलपणे म्हणाले, "लग्न तुमचे की मुलाचे?'' या विनोदाला पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपच्या सगळ्या नेत्यांनी दाद दिल्याने एकच खसखस पिकली. पण त्याचवेळी शेजारी श्रीमती कलावती चव्हाण उपस्थित असल्याचे पाहुन खासदार दानवेंनी हात जोडत चीभ चावली. हे प्रकरण एव्हढ्यावर न थांबता स्टेजवर शुभेच्छा देतानाही गिरीश महाजन यांनी हा प्रसंग जाहीरपणे सांगीतल्याने सगळे मनमुराद हसले. 

आजच्या समारंभाला राज्यभरातील नेत्यांनी हजेरी लावली. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री मधुकर पिचड, विजयकुमार गावित, खासदार हिना गावित, आमदार निर्मला गावित, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, खासदार हेमंत गोडसे, भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांसह विविध नेत्यांनी हजेरी लावली. राज्यभरातील लोकप्रतिनिधी नेत्यांची एव्हढी गर्दी झाली होती की त्यांना जागेसाठी खुर्च्यांची शोधाशोध करावी लागली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख