raosaheb danve matoshree | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मातोश्रीवरील बैठकीत दानवे  होते, हो ! भाजपचा खुलासा 

ब्रह्मा चट्टे 
रविवार, 18 जून 2017

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे दानवे यांच्या बचावासाठी भाजपला कंबर कसावी लागली. या महत्त्वाच्या बैठकीला दानवे उपस्थित होते असा खुलासा पक्षातर्फे सांयकाळी उशिरा करण्यात आला आहे. 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीवेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना वगळण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे दानवे यांच्या बचावासाठी भाजपला कंबर कसावी लागली. या महत्त्वाच्या बैठकीला दानवे उपस्थित होते असा खुलासा पक्षातर्फे सांयकाळी उशिरा करण्यात आला आहे. 

आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर "एनडीए'च्या घटक पक्षांशी चर्चा करण्याचा एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी अमित शहा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या सोबत मातोश्रीवर पोहचले. मात्र, तेथे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित शहा, देवेंद्र फडणवीस या चौघांमध्येच बैठक झाल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे महत्त्वाच्या बैठकीतून दानवेंना वगळळ्याची चर्चाही दिवसभर सुरू होती. 

दानवे यांना बैठकीपासून दूर ठेवण्याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, याला सततच शिवसेना विरोधाची किनार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू आहे. 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत गेल्या दोन निवडणुकीत शिवसेनेने आपली मते संयुक्त पुरोगामी आघाडेचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना व त्यापूर्वी श्रीमती प्रतिभा पाटील यांना दिली होती. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे -अमित शहा यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. महत्त्वाच्या बैठकीतपासून दानवेंना का वगळले! दानवे का दूर ठेवले ? शिवसेनेला दानवेंवर विश्वास नाही का ? असे प्रश्‍नाची राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा सुरू होती. शेवटी भाजपला याविषयी पत्रक प्रसिद्ध करून खुलासा करावा लागला. 

दानवे बैठकीला उपस्थित होते : भांडारी 
रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीवरून चर्चा रंगली असताना प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात मात्र दानवे चर्चेला उपस्थित होते असे म्हटले आहे. भांडारी म्हणाले, "" भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या धोरणात्मक चर्चेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते.''  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख