रावसाहेब दानवे यांच्याकडूनही कोरोनाग्रस्ताना एक कोटी, एक लाख रुपये

भाजपचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खासदार निधीमधून एक कोटी रुपये व एक महिन्याचे मानधन असे एक कोटी एक लाख रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधी देऊ केले आहेत
Raosaheb Danve Gives Fund to PM Relief Fund
Raosaheb Danve Gives Fund to PM Relief Fund

औरंगाबाद : भाजपचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या खासदार निधीमधून एक कोटी रुपये व एक महिन्याचे मानधन असे एक कोटी एक लाख रुपये कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पंतप्रधान सहाय्यता निधी देऊ केले आहेत.या संदर्भातील पत्र त्यांनी संबंधित खात्याला पाठवले असून हा निधी वर्ग करण्यास सांगितले आहे.  देशावर कोरोनाचे मोठे संकट ओढवलेले आहे . केंद्र व राज्य सरकार कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक उपाययोजना करत असताना लोकप्रतिनिधीही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, ग्रामसेवक, नगरसेवक यांनी आपापल्या परीने वैयक्तिक व आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून केंद्र व राज्य सरकारच्या सहाय्यता निधीमध्ये योगदान दिले आहे . नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या खासदार निधीतून एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानंतर आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील खासदार निधीतून एक कोटी आणि एक महिन्याचे मानधन एक लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधी देण्याचे घोषित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com