Raosaheb Danve comment on UdayanRaje's entry | Sarkarnama

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशावर रावसाहेब दानवे म्हणाले, जहां प्रजा वहां राजा !

तुषार पाटील
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

भोकरदन : पूर्वीच्या काळी जहां राजा  वहां प्रजा!, अशी स्थिती होती . आता मात्र भारतात लोकशाही आहे.  त्यामुळे जहा प्रजा वहा राजा! अशी स्थिती आहे.  त्यामुळे उदयनराजे यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे.  

  सर्वप्रथम संभाजीराजे, त्यानंतर शिवेंद्रराजे आता उदयनराजे सारे राजे भारतीय जनता पक्षात आले असून त्यांनी योग्यवेळी प्रजेचा कल लक्षात घेतला आहे,  अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी सरकारनामाशी आज बोलताना दिली .

raosaheb danve facebook साठी इमेज परिणाम

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी  संवाद साधला. "राजाला प्रजेचा मान राखावा लागतो" असे देखील दानवे  यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षि शाहू महाराज यांचे वंशज असणारे हे सर्व राजे असून त्यांच्यामागे एक वलय आहे.त्यांना मानणारा महाराष्ट्राचा मोठा मतदार आहे.

राजांचा झालेला भाजपा प्रवेश हा भाजपला जातीवादी म्हणणारा पुरोगाम्यांच्या तोंडावर चपराक असून भाजप हा आता सर्वसमावेशक पक्ष झालेला आहे याउलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता खऱ्या अर्थाने ओहोटी लागली आहे, अशी श्री. दानवे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख