Raosaheb Danve attacks Rahul Gandhi | Sarkarnama

राहुल गांधींकडे पुरावे होते तर न्यायालयात का नाही मांडले ? : दानवे 

सरकारनामा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

.. 

जालना :  राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता.14) दिलेल्या निकालामुळे सत्याचा विजय झाला आहे. राजकीय फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय खोटे आरोप केल्याबद्दल कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी यांच्यासह देशातील जनतेची, सैनिकांची माफी मागावी, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी सरकारने भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी प्रशासन दिले आहे. त्याला भ्रष्टाचाराचा डाग लावण्याच्या राजकीय उदेशाने राहुल गांधी यांनी "राफेल'बाबत आरोप केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात या सर्व आरोपांची उत्तरे मिळाली आहेत. राहुल गांधी यांच्याकडे राफेलबाबत पुरावे होते तर त्यांनी ते न्यायालयात मांडायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. कारण त्यांच्याकडे काहीही पुरावेच नव्हते, असे दानवे म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख