उद्धव ठाकरेंनी अयोध्येत मोदींवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी, दानवेंचा हल्लाबोल 

उद्धव ठाकरेंनी अयोध्येत मोदींवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी, दानवेंचा हल्लाबोल 

लातूर ः अयोध्येत जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही. त्यांनी तेथे जावून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी आहे, हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी येथे केली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी दानवे ऱविवारी (ता. ) येथे आले होते. येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. शनिवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जावून झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी येथे आलो आहे, अशी टीका मोदींवर केली होती. यावर बोलताना ते म्हणाले, "राम मंदिर हा मुद्दा नवीन नाही या मुद्यावर शिवसेना-भाजपसोबत होती. हा निवडणुकीचा मुद्दाच होवू शकत नाही. ठाकरे हे अयोध्येत गेले त्यांचे स्वागत आहे. पण त्यांना याचा राजकीय फायदा होणार नाही.'' 

"" तेथे जावून शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलला असला तरी भाजपला तोटा होणार नाही. भाजप हा विकासाचा अजेंडा घेवून लोकसभा निवडणूक लढणार आहे." आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक समविचार पक्षानी एकत्र येवून लढवावी ही भाजपची इच्छा आहे. मत विभाजनाचा कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा होवू नये हे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शिवसेनेशी युतीचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणावरून भाजप समाजात दुही पाडत आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती, यावर बोलताना दानवे म्हणाले, "मराठा समाजाला 
आरक्षण द्यावे असा कार्यकारणीत ठराव घेणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. त्या करीता आम्ही विधानसभेत कायदा केला. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीवरून 
निर्णय घेतला आहे. व्होट बॅंक म्हणून निर्णय घेतला नाही. जनता आता विकासाला प्राधान्य देत आहे." 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वासच राहिला नाही. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा भाजप जास्त जागा जिंकेल असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला. 

यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, गणेश हाके, नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com