खडसेंना उमेदवारी न मिळण्याबद्दल दानवेंचे संकेत?

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 35 वर्षापासून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आता कुणी कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. भविष्यात मात्र, पक्ष त्यांचा फार मोठा विचार करेल, अशी प्रतिक्रीया केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्‍त केली.
Raosaheb Danve - Eknath Khadse
Raosaheb Danve - Eknath Khadse

औरंगाबाद : एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 35 वर्षापासून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आता कुणी कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. भविष्यात मात्र, पक्ष त्यांचा फार मोठा विचार करेल, अशी प्रतिक्रीया केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्‍त केली. 

गुरुवारी सकाळपासून खडसेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार निघाले असल्याची चर्चा पुढे येत आहे. या अनुषंगाने दानवे यांनी हे मत व्यक्‍त केले. 
विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (ता.तीन) फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दानवे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी खडसे यांच्या नाराजीबद्दल तसेच अन्य पक्षाचे नेते त्यांना पक्षांतर करण्यास सांगत आहेत, याबद्दल विचारले असता. दानवे म्हणाले, ''खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आता तिकीट मिळेल की नाही, हे माहिती नाही. पक्षांतरासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्या प्रयत्नांना खडसे बळी पडले नाहीत. त्यामुळे आत्ताही कुणाचेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. उलट भविष्यात पक्ष त्यांचा मोठा विचार करेल,'' असे प्रतिपादन दानवे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com