raosaheb danve | Sarkarnama

शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी ः दानवे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पिंपरी ः भाजप शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या विरोधात नाही. याबाबत योग्यवेळी निर्णय घेऊ, पण त्यापूर्वी शेतकरी कर्जबाजारीच होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे''असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांनी 
आज (ता.27) चिंचवड येथे केले. शेतीत शाश्‍वत गुंतवणूक होत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होणार नाही,असेही ते म्हणाले. त्यासाठी त्यांना वीज, शेततळे आदी गोष्टी पुरविण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. 

पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपानंतर ते अनौपचारिकरीत्या बोलत होते. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने शेतकरी कर्जमुक्तीचे आश्‍वासन दिल्याने निवडून आल्यानंतर ते पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ते त्यांनी कसे केले, याचा अभ्यास भविष्यातील यासंदर्भातील ध्येयधोरणासाठी महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचा तूर्त भाजपमध्ये प्रवेश होणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, भविष्यात निश्‍चितच मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे भाकीतही त्यांनी केले. मात्र, राणे वगळता कोण मोठा नेता गळाला लागणार आहे, हे त्यांनी सांगितले नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख