जीन्स, टी शर्ट घालून रावसाहेब दानवेंची सिडनीवारी : `दाजीं`चा वेगळेपणा कालही आणि आजही

राज्यातील राजकीय कटकटींपासून रावसाहेब सध्या दूर
raosaheb-danave-in-australia
raosaheb-danave-in-australia

भोकरदनः केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. सिडनी शहरात जीन्स, टी शर्ट घालून फेरफटका मारतानाचे त्यांचे रुप पाहून सगळेच अचंबित झाले आहेत.

मतदारसंघ आणि भारतात खादीचे कडक कपडे, त्यावर मोदी जॅकेट घालून मिरवणाऱ्या दानवेंचा हा नवा अवतार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. जैसा देश वैसा भेंस, असे म्हणत दानवेंनी विदेशातही आपले वेगळेपण जपल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

सरपंच ते भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार आणि दोनवेळा केंद्रा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळालेले रावसाहेब दानवे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. विरोधकांची टीका, वादग्रस्त वक्तव्यावरून पेटलेले रान अशा परिस्थीतही विचलित न होता काम करत राहणे हा रावसाहेब दानवे यांचा गुणधर्म वाखणण्या सारखा आहे. अस्सल गावरान भाषेतील त्यांची भाषण म्हणजे त्यांच्या समर्थकांसाठी पर्वणीच असतात.

सध्याचे केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री असलेले दानवे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले आहेत. अन्न व सार्वजनिक वितरणाच्या क्षेत्रात केंद्राने नवा कायदा केला आहे. या प्रक्रियेमध्ये ऑस्ट्रेलिय-भारत परिषद आणि ग्राहक व्यवहार विभाग एकत्रितपणे काम करत आहेत. याचाच एक भाग म्हणून रावसाहेब दानवे एक शिष्टमंडळ घेऊन ऑस्ट्रेलियात आले आहे.

निळ्या रंगाची जीन्स पॅंट, टी र्शट आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे स्वेटर घातलेले रावसाहेब दानवे यांचे सिडनीतील फोटोशेशन सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना-भाजप महायुतीत तुटली, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्या सारख्या पक्षातील बड्या ओबीसी नेत्यांनी बंड पुकारले. अशा तणावाच्या राजकीय परिस्थीतीपासून "गड्या आपली दिल्लीच बरी' अशी भूमिका सध्या रावसाहेब दानवे यांनी घेतलेली दिसते. आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात राज्यात भाजपला वैभवाचे दिवस दाखवणारे रावसाहेब दानवे राज्यातील राजकीय घडमोडींपासून दूर थेट विदेशात रमल्याने सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com