शिवसेनेच्या आमदारांना सत्तेच्या नशेतच राहू द्या : रावसाहेब दानवे

शिवसेनेवर वार करण्याची भाजप नेत्यांना संधी!
raosaheb danave on shivsena
raosaheb danave on shivsena

औरंगाबाद : ``गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदारांना सत्तेच्या अफूच्या गोळ्या दिल्या जात होत्या, त्यामुळे शिवसेनेचे आमदार सत्तेच्या नशेतच वावरत होते. त्यांना तसेच राहू द्या,`` अशा शब्दात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला .

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रावसाहेब दानवे प्रसारमाध्यमांशी बोलत होते . ते म्हणाले, शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला होता , काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्तास्थापनेचे त्यांचे प्रयत्न सुरू होते ते जनतेला पटत नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीने शेवटपर्यंत शिवसेनेला झुलवत ठेवले,  शिवसेनेचे आमदारही सत्तेच्या नशेत 'आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला ,तर तुमची डोके फोडून दवाखान्याचा खर्च आम्ही करू, अशी भाषा वापरू लागले होते.

आम्ही सुरुवातीपासून राज्यात भाजपची सत्ता आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं वारंवार सांगत होतो, त्यानुसार आज घडल. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली असा आरोप चुकीचा आहे, कारण अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आहेत, आणि त्यांनीच आपल्या समर्थक आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला आहे. 

शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची विचारधारा वेगळी असल्यामुळे शिवसेनेसोबत आपण सरकारमध्ये सामील होऊ शकत नाही. या निर्णयापर्यंत अजित पवार आले होते, म्हणून त्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट देऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आमचं सरकार पाच वर्ष टिकेल आणि गेल्या वेळेपेक्षा अधिक जोमाने आम्ही काम करू, असा विश्वासही रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

सातारा : माझे शुक्रवारी रात्री उशिरा आणि अजित पवार यांच्याशी बोलणे झाले होते. पण भाजपसोबत जाण्याबाबत कसलीच चर्चा झाली नाही. आजच्या या प्रकाराबाबत मला कोणतीही कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

जयंत पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याशी माझी रात्री उशीरा बोलणे झाले होते, त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस सोबतची चर्चा लवकर मिटली पाहिजे, फार वेळ लागला असे त्यांचे मत होते, पण ते भाजप सोबत जातील याची  मला कोणतीच कल्पना नव्हती. आता मी पवारसाहेब यांची भेट घेण्यासाठी निघालो आहे, त्यामुळे प्रसार माध्यमांनी  अधीर होऊ नका.पवार साहेब त्यांच्याशी चर्चा करून मी सर्व माहिती घेऊन सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com