रावसाहेब दानवे घेणार पुण्यातील आमदारांची `शाळा`

रावसाहेब दानवे घेणार पुण्यातील आमदारांची `शाळा`

पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची लोकसभा निवडणुकीनंतर पुण्यातील पहिली बैठक आज होत आहे. या बैठकीला शहरातील सर्व आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांना निरोप देण्यात आले आहेत. त्यामुळे विधानसभेच्या आगामी निवडणुकांची तयारी हा मुख्य विषय बैकीच्या अजेंड्यावर असावाल असे सांगण्यात येत आहे. 

दानवे केंद्रीय मंत्री झाले असले तरी अद्याप त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाचा जबाबदारी कायम आहे. मंत्री झाल्याने येत्या काही दिवसात दानवे यांनादेखील प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नियोजनाप्रमाणे पक्षाची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या तयारीचा भाग म्हणून आजची बैठक असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेताना या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्‍याचा प्रामुख्याने विचार होणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारसंघात आलेल्या अडचणी, शिवसेनेने केलेले सहकार्य तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात पुण्यात आणि राज्यात होणाऱ्या संभाव्य राजकीय स्थितीचा विचार या बैठकीत होणार असल्याचे सांगण्यात आले. 

विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यांच्या जागी नवा अध्यक्ष निवडायचा की त्यांचीच तीन वर्षाच्या दुसऱ्या टर्मसाठी निवड करायची याबाबतदेखील पदाधिकाऱ्यांच्या भावना या बैठकीत जाणून घेण्यात येऊ शकते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com