मारामारी झाल्यानंतर हरिभाऊ जावळेंचे नाव दानवेंनी जाहीर केले...

स्पर्धेतील नऊ जणांसोबत बंद खोलीत रावसाहेब दानवे, प्रदेश पदाधिकारी सुजित ठाकूर, गिरीश महाजन यांनी चर्चा केली. त्यावेळी प्रदेश स्तरावर नावे देऊन त्यांच्याकडून येईल ते नाव जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली.
haribahu jawale as jalgaon bjp chief
haribahu jawale as jalgaon bjp chief

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली. इच्छुक नऊ उमेदवारांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीची घोषणा केंद्रीय मंत्री व निवडणूक निरीक्षक रावसाहेब दानवे यांनी केली.

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी आज जळगाव येथे सिंधी कॉलनीतील बाबा हरदासराम मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होते. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार चंदुलाल पटेल आदी उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी भुसावळ शहराध्यक्ष निवडीवरून वाद झाला; परंतु त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवडीचे काम शांततेत झाले. जिल्हाध्यक्षपदासाठी प्रारंभी 19 जणांची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर तब्बल दहा जणांनी माघार घेतली. त्यानंतर या स्पर्धेत जिल्हा प्रभारी अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, पी. सी. पाटील, अजय भोळे, गोंविंद अग्रवाल, दिलीप खोडपे, उद्धव महाजन, दीपक पाटील, माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नऊ होते.

बंद खोलीत चर्चा

स्पर्धेतील नऊ जणांसोबत बंद खोलीत रावसाहेब दानवे, प्रदेश पदाधिकारी सुजित ठाकूर, गिरीश महाजन यांनी चर्चा केली. त्यावेळी प्रदेश स्तरावर नावे देऊन त्यांच्याकडून येईल ते नाव जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी सात जणांनी माघार घेतली. अंतिम क्षणी पी. सी. पाटील व माजी आमदार हरिभाऊ जावळे हे दोनच स्पर्धेत होते. मात्र, शेवटी पाटील यांनी माघार घेतली.

दानवेंनी केली घोषणा
तब्बल तासाभराच्या चर्चेनंतर एकमताने निर्णय झाल्यानंतर पक्षाचे निवडणूक निरीक्षक व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वाढीत (कै.) उत्तमराव पाटील, (कै.) चंद्रकांत मेंडकी, (कै.) गुणवंतराव सरोदे यांच्यासह एकनाथराव खडसे, गिरीश महाजन तसेच अनेकांचे योगदान आहे. आता पक्ष वाढविण्याची ही जबाबदारी आपल्यावर आली असून, आपण समर्थपणे कार्य करणार आहोत. "आपण सारे बहीण- भाऊ भाजपला पुढे नेऊ'ही आपली घोषणा असणार आहे, हरिभाऊ जावळे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com