दानवेंच्या बचावासाठी उतरले पुण्यातले दोन नगरसेवक...

दानवेंच्या बचावासाठी उतरले पुण्यातले दोन नगरसेवक...

पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर "टाईम' मासिकाच्या मुखपृष्ठावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबाबत अभिनंदनाचे ट्विट करून अडचणीत आलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बाजू सावरण्यासाठी पुण्यातील दानवे समर्थकांनी पुढाकार घेतला आहे. या प्रकारणात दानवे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, अशी पुणे पोलिसांकडे तक्रार करून या घटनेचा तपास करून दोषींविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक किरण दगडे-पाटील आणि अमोल बालवडकर यांनी केली आहे. 

टाईमने आपल्या कव्हरवर मोदींचा फोटो प्रसिध्द करतानाच त्यावर "इंडियाज डिव्हायडर इन चिफ' असा मजकूर लिहिला आहे. "भारताला विभागणारा प्रमुुख' या अर्थाने हा फोटो प्रसिध्द झाला. त्यानंतर काही वेळातच दानवे यांनी "ट्विट'द्वारे पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. त्यामुळे मोदी यांचा फोटो आणि दानवेंचे ट्विट हा चर्चेचा विषय ठरला. अशा प्रकारे दानवे यांनी मोदींच्या अभिनंदनासाठी उतावीळपणा दाखविल्याने भाजपसह सर्व राजकीय पक्षांच्या वर्तुळातील चर्चा दानवेंभोवतीच फिरत होती. 

एरवी, गंमतशीर विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या दानवे यांना या घटनेमुळे स्वपक्षीयांसह विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर हे प्रकरण बनावट असल्याचा दावा करीत, पुणे महापालिकेतील दानवे समर्थक नगरसेवक दगडे-पाटील आणि बालवडकर यांनी पोलिस ठाणे गाठून चौकशीची मागणी केली. हिंजवडी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार अर्ज दिला. हे ट्विट दानवे यांनी केले नसून, त्यांच्या नावाने हे ट्‌विट करण्यात आले आहे. त्यासाठी फोटो शॉपचा वापर करून दानवे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दानवे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने अशा पध्दतीने राजकारण करण्यात येत आहे, असे दगडे-पाटील आणि बालवडकर यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दगडे-पाटील आणि बालवडकर हे दानवे यांचे समर्थक मानले जातात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com