raosaheb danave about devendra fadavnis post | Sarkarnama

मुख्यमंत्री बदलाची कोणतीही हालचाल नाही : दानवे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री बदलाचे वारे नाही. हे वारे सत्ता गेलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनीच निर्माण केले आहे. आरक्षण मागणाऱ्यांची तशी मागणी नाही. आमच्याकडे कोणत्याही अशा हालचाली नाहीत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

सातारा : मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री बदलाचे वारे नाही. हे वारे सत्ता गेलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनीच निर्माण केले आहे. आरक्षण मागणाऱ्यांची तशी मागणी नाही. आमच्याकडे कोणत्याही अशा हालचाली नाहीत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले, निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन, घाई गडबडीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण मते मिळविण्यासाठी व सरकार पुन्हा सत्तेत आणण्यासाठी होते. आजही भारतीय जनता पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावा, या मताचा आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागत आहे. मराठा समाजाने असिंहक पध्दतीने आंदोलन केले तर त्यांची अजून प्रतिष्ठा वाढेल. 

विधानसभेतही आमच्या सरकारने आरक्षण देण्याबाबत ठराव केला आहे. पण मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्याशिवाय व तो न्यायालयात सादर केल्याशिवाय निर्णय होणार नाही. त्यानंतर स्थगिती उठून आरक्षण मिळेल. त्याला थोडा वेळ लागले पण आम्ही आरक्षण मिळावे, याच भुमिकेत आहोत. 
58 मोर्चे काढूनही मराठा समाजाला आश्‍वासनाशिवाय काहीही मिळालेले नाही, आता मराठा समाज संतप्त होऊन रस्त्यावर उतरला आहे. याविषयी श्री. दानवे म्हणाले, समाजाची भावना आम्ही समजू शकतो, असेही दानवे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख