रणजितसिंह निंबाळकरांचा आज मुंबईत भाजप प्रवेश

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर आज दुपारी एक वाजता कुलाबा (मुंबई) येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार असून यावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.
रणजितसिंह निंबाळकरांचा आज मुंबईत भाजप प्रवेश

सातारा : कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर आज दुपारी एक वाजता कुलाबा (मुंबई) येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार असून यावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत.

सातारा जिल्हा कॉंग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. शनिवारी त्यांनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे पाठविला आहे. फलटणचे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोन फेब्रुवारीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारले होते. जिल्हाध्यक्ष पद घेऊन सव्वा दोन महिने पूर्ण होत असतानाच रणजितसिंह यांनी केवळ माढा मतदारसंघातुन भाजपचे तिकीट मिळत असल्याने कॉंग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.

आज दुपारी एक वाजता मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांची भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीही जाहिर होण्याची शक्‍यता आहे. यावेळी भाजपचे युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील, खटावचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सातारा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे माणचे नेते अनिल देसाई, फलटणचे नेते समशेरसिंह निंबाळकर, आदी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com