खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, `रामराजे तर बिनालग्नाची औलाद'

``मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर ह्या रणजितसिंहाच्या 96 पिढ्यात नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलांचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडीलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतू बोलावं लागलं, असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथील जाहीर सभेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केला.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, `रामराजे तर बिनालग्नाची औलाद'

फलटण : ``मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर ह्या रणजितसिंहाच्या 96 पिढ्यात नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलांचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडीलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतू बोलावं लागलं, असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथील जाहीर सभेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तब्बल पाऊण लाखांच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर  24 मे रोजी फलटण मध्ये सायंकाळी सात वाजता विजयसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, माजी सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,  उपाध्यक्ष अनिल देसाई, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. नरसिंह निकम, नगरसेवक अनुप शहा, भाजप नेते सुशांत निंबाळकर, जयकुमार शिंदे, नगरसेवक सचिन बेडके, सचिन अहिवळे, अशोकराव जाधव आदि उपस्थित होते. 

यावेळी नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा फलटणकरांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, की सुमारे 23 वर्षानंतर फलटणला खासदारकी मिळालेली आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या अंगाला 23 वर्षांनंतर गुलाल लागलेला आहे. कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फलटण तालुक्यातील तलाठी, पोलिस, प्रांत, तहसिलदार यांनी जर काम करण्यासाठी पैसे मागितले तर पायातलं काढून सरळ टाळक्यात हाणायचं. हा रणजितसिंह नाईक-निंबाळकर तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तालुक्यातील सत्ताधार्‍यांनी भ्रष्टाचार केला. त्याला तालुक्यातील अधिकार्‍यांनीही पाठबळ दिले. त्यामुळे अधिकार्‍यांनो, इथून पुढे तालुक्यात भ्रष्टाचार चालणार नाही. जमत नसेल तर बदल्या करुन घ्या. यापुढे एकही तक्रार चालणार नाही. जो अधिकारी तालुक्यातील जनतेसाठी काम करेल, शेतकर्‍यांसाठी काम करेल, त्यांचा निश्‍चितच सन्मान केला जाईल.

कार्यकर्त्यांनो सत्ता आहे म्हणून ऊतु नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. अधिकार्‍यांना अरेरावीची भाषा करु नका. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान करा. त्याच्या घरासमोर गुलाल टाकू नका. तोही तुमच्यासारखाच सामान्य कार्यकर्ता आहे. 23 वर्षानंतर तुमच्या अंगाला गुलाल लागलेला आहे. त्याचा सन्मान करा. फलटण तालुक्यात आता नवीन जीआर आलेला आहे. त्या जीआरमध्ये इथं केलेलं पाप इथंच फेडायचं आहे. रामराजेंनी केलेल्या पापाचं फळ आणि शिक्षा ठरलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, ``रामराजे नाईक-निंबाळकर यांनी 23 वर्षे सत्ता भोगली, परंतू निरा-देवधरचं पाणी यांना तालुक्याला देता आलं नाही. बारामतीकरांचं तळवं चाटून फलटणकरांचं पाणी बारामतीला कसं जाईल, हेच यांनी बघितलं. तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. तुमचं काय आहे हे आम्हाला माहित नाही का? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल आणि कोणी त्या लग्नाचा दाखला दाखवला तर त्याला मी एक हजाराचं बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे. रामराजेच्या वडिलांना मालोजीराजेंनी म्हणजेच त्यांच्या आजोबांनी घरात घेतलं नव्हतं. रामराजेंच्या आई वडिलाचं लग्न झालं नसल्यामुळेच त्यांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. मला खालच्या पातळीवर जावून वाईट बोलायचं नव्हतं. परंतू प्रत्येकवेळेस वाईट ऐकून घेण्याची ताकद आता संपलेली आहे, त्यामुळे आता उत्तर द्यावं लागलं. नाईलाज आहे.''

``मी कर्ज काढलं म्हणून तुम्ही मापं काढता. अहो रामराजे, पिठाची गिरणी काढायची झाली तरी कर्ज काढावं लागतं. आणि माझ्यावरचं कर्ज फेडायला हा रणजितसिंह नाईक-निंबाळकर समर्थ आहे. त्यामुळे तुमचं कर्तृत्व ते काय? तुमचा मुलगा अनिकेत आणि माझं वय सारखं आहे. वयाच्या 34 व्या वर्षी मी कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष झालो आणि 42 व्या वर्षी खासदार झालो. कमी वयात मी एक साखर कारखाना, एक दूधसंघ उभा केला आहे. मग रामराजे आपलं कर्तृत्व काय? बापजाद्यांच्या जमिनी तुम्ही विकल्या. त्यामुळे रामराजे तालुक्यात तुम्ही एक पतसंस्था तरी उभी केली काय? साखरवाडी बंद पाड, तिकडे डॉ. तासगांवकरांची संस्था बंद पाड, रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अडचणीत आण, जयकुमार गोरेंना अडचणीत आणून त्रास दे, अशा भानगडी तुम्ही केल्या. आज साखरवाडीचे हजार कामगार उपाशी बसलेले आहेत. हे तुम्ही केलेल्या पापाचं फळ आहे. या पापाचं फळ तुम्हाला निश्‍चितच मिळणार आहे,'' असे ते म्हणाले.

``दारिद्य्ररेषेखाली आहे, असा आशिर्वाद सोसायटीमधील दाखला तुम्ही मिळवला. तुमची सगळी ऍफिडेव्हिट माझ्याकडे आहेत, पण हा रणजितसिंह तुम्हाला जेलमध्ये बसवणार नाही, काळजी करु नका! कृष्णा खोरेचं मंत्रीपद असताना तुम्ही लवासाला जमिनी दिल्या, ते काय मला माहित नाही का? तुम्हाला सभापतीपद मिळाल्यानंतर तालुक्याचा विकास होईल, तालुक्यात आणखी काही चांगलं होईल, म्हणून तुमच्या भानगडी मी बाहेर काढल्या नाहीत. शिंदे कन्स्ट्रक्शन, सगुणामाता कन्स्ट्रक्शन कोणाच्या जिवावर चालतं, हे काय आम्हाला माहित नाही काय? उरमोडीच्या जोड कालव्यात जोड टेंडर काढून तुम्ही पैसे खाल्ले हे काय आम्हाला माहित नाही काय? आम्हाला सगळं पुराव्यानिशी माहित आहे. पण मला तुमचं वाईट करायचं नाहीये,'' असे त्यांनी सांगितले.

येणार्‍या 10-15 वर्षात तालुक्याचा विकास करायचाय, असे सांगून ते म्हणाले, की उपळवे येथे एमआयडीसी, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, नीरा-देवधरचे पाणी तालुक्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत न्यायचे उद्दिष्ट आहे. फलटण-लोणंद- बारामती- पंढरपूर हा अडकलेला रेल्वेप्रकल्प चालू करायचा आहे. उत्तर कोरेगावकरांनी आता टेन्शन घ्यायचं नाही. वसणा-वांगना, जिहे कठापूर या रखडलेल्या योजना हा रणजितसिंह नाईक-निंबाळकर पूर्ण करणार आहे, हा शब्द देतो. फलटणमधील विमानतळ स्वत:चं आहे म्हणून या तिन्ही भावांनी कोर्टात खटला भरलेला आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. यांना तालुक्याचा विकास करायचा नाही, तर जमिनी लुबाडून पैसा कमवायचा आहे. मी ओरिजनल आणि रक्ताचा नाईक-निंबाळकर आहे. यांचा बाप कोण, आई कोण हे मला सगळं माहित आहे. मी हिंदुराव नाईक-निंबाळकराची औलाद आहे. माझ्या मिशांवरुन यांनी माझ्यावर टीका केली. अरे पण मिशा उगवाव्या लागतात. मिशा ही मर्दाची निशाणी आहे. त्यासाठी मर्द व्हावं लागतं. परंतू तुम्हाला मात्र मर्द भाड्यानं आणायला लागतात. कशाला बोलायला लावताय? माझी लढाई रामराजे, संजूबाबा, पिट्टू बरोबर नाही. माझी लढाई हत्तीबरोबर म्हणजेच बारामतीकरांबरोबर आहे. मी सोलापूरहून गुलाल घेवून आलोय. पिट्टूचा डायलॉग आहे, लगीन लोकांचं पण तुम्ही कोणाच्या लग्नात नाचताय? मी फलटण तालुक्यात मतांसाठी फिरलो नाही. लोकांना मुक्तपणे मतदान करु द्या, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले. परंतू रामराजेंनी लोकांना धमकावून मते मागितली. संस्थेतील कर्मचार्‍यांना बदली करेन, काढून टाकेन असे धमकावून कामे करायला सांगितली. परंतू ये पब्लिक है. जे पब्लिक डोक्यावर घेतं, तेच पब्लिक पायाखालीसुद्धा घेतं.

23 वर्षानंतर फलटणकरांनी खासदारकी खेचून आणली आहे. मी फलटणमध्ये फिरलो असतो, तर पन्नास हजाराने मताधिक्य वाढले असते. आज जो निवडून आलोय, हे फलटणकरांचं प्रेम आहे. फलटण तालुक्याच्या विकासासाठी मी बांधिल आहे, असे म्हणत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी रामराजेंसह त्यांच्या दोघा बंधूंवर सडकून टीका केली.  सुशांत निंबाळकर यांनी आभार मानले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com